मुखेड उपजिल्हा रुग्णालयाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांचे नाव द्या.

▫️काँग्रेसचे प्रशासनाला निवेदन; सकारात्मक निर्णयाची अपेक्षा, अन्यथा आंदोलनाचा इशारा
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : १६ नोव्हेबर २६
शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण करून त्यास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न ‘डॉ. बी. आर.आंबेडकर उपजिल्हा रुग्णालय, मुखेड‘ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी मुखेड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. श्रावण रॅपणवाड आणि मुखेड काँग्रेसचे शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासनाला अधिकृत निवेदन सादर केले.
मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालय हे शहर आणि ग्रामीण भागातील गोरगरीब, सर्वसामान्य आणि वंचित घटकांसाठी आरोग्याचा मुख्य आधारस्तंभ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित, पीडित आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी व कल्याणासाठी वेचले. त्यामुळे सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देणाऱ्या या महत्त्वाच्या शासकीय रुग्णालयास महामानवाचे नाव दिल्यास तो त्यांच्या महानकार्याचा खऱ्या अर्थाने गौरव ठरेल, अशी भावना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शासनाने व संबंधित विभागाने या लोकभावनेचा सकारात्मक विचार करून नामकरणाचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाला निवेदन देते वेळी शिष्टमंडळात तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर, जिल्हा सेवादलाचे उपाध्यक्ष विद्याधर अण्णा साखरे, जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव सुनिल पाटील आरगीळे, सोशल मीडिया काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ तिपणे, जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस सचिन गुद्दे, फिशर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पंदीलवाड, उद्योग विभागाचे शहराध्यक्ष विकास आकुलवाड, शहर उपाध्यक्ष बालाजी वाडेकर, शेख रौफ, सेवादल कोषाध्यक्ष शिवाजी जांभळीकर, पत्रकार राजु बनसोडे, मनोहर यरपुरवाड,सामाजिक कार्यकर्ते गौसअली सलगरकर, देवबा सोनकांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या मागणीच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्रीमा.प्रकाशजी आबिटकर, खासदार अशोकराव चव्हाण, खासदार अजित गोपछडे, खासदार प्रा. रवींद्रचव्हाण, आमदार डॉ. तुषारजी राठोड, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी जि.प. अध्यक्ष तथा शेतकरी नेते दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते आणिप्रशासकीय विभागांना पाठविण्यात आल्या आहेत.
या महत्त्वपूर्ण मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी लवकरच एका विशेष समितीची स्थापना करण्यातयेईल, अशी माहिती शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांनी दिली. तसेच, प्रशासनाने या मागणीचीतातडीने दखल घेऊन कार्यवाही न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असाखणखणीत इशाराही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.



