तहसील येथे मुख्यमंत्री ‘100 दिवसाची कार्यालयीन सुधारणा’ या उपक्रमांतर्गत विशेष शिबिर संपन्न

मुखेड प्रतिनिधी:-
दि. ०३ एप्रिल रोजी मुखेड तहसील कार्यालयात मुख्यमंत्री ‘100 दिवसाची कार्यालयीन सुधारणा‘ या उपक्रमांतर्गत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होत , ज्यामध्ये नागरिकांच्या समस्या आणि कामांसाठी सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देण्याचा आली.
नागरिकांच्या समस्या सोडवणे शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या त्वरितसोडवणे कामकाजात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसाठी उपाययोजना करणे आणि नागरिकांन सोयीस्कर आणि जलद सेवा देण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करणे. संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजना यांचे पात्र अर्जाची जागेवरच मंजुरी व लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण ,शिधापत्रिका बाबत सर्व अर्जाची स्वीकृती, मंजुरी व निकाली काढणे तथा पात्र लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे. सर्व प्रमाणपत्र सेतू मार्फत अर्जदार यांच्या WhatsApp वर देणे ई उपाययोजना करणे यांसारखे उपक्रम राबविण्यात आले या विशेष शिबिर मधे असंख्य लाभार्थीनी लाभ घेतले आहे
या वेळी तहसीलदार मा.राजेश जाधव, नायब तहसीलदार एस. एस. मामीलवाड व पांडुरंग गंगणर निराधारविभाग पुरवठा सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.




