Uncategorized

शहीद जवान सचिन वनंजे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप.

देगलूर प्रतिनिधी:-

काश्मीरमध्ये सैन्याचं वाहन दरीत कोसळून वीरमरण आलेले जवान सचिन वनंजे यांच्यावर आज देगलूरमध्ये अंतिम संस्कार करण्यात आलेजवान सचिन वनंजे यांच्या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होतेयावेळी अंत्ययात्रेवर शहरातून सर्वत्र फुलांची उधळण करण्यात आलीसचिन वनंजेयांना सलामी देत शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आलेयावेळी लोकप्रतिनिधी आणिअधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला कडेवर घेऊन पत्नीनं आपल्या पतीला अखेरचा निरोप दिला मे रोजीजम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर इथं ८००० फूट खोल दरीत भारतीय सैन्य दलाचं वाहन कोसळल्यानं कर्तव्यावर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथले २९ वर्षीय सचिन वनंजे यांना वीरमरण आलं होतंतांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर काल रात्री सचिन यांचं पार्थिव देगलूर इथं आणण्यात आलंयावेळी सचिनयांच्या पत्नीभाऊ आणि आई वडिलांना अश्रू अनावर झाले.

शहीद जवान सचिन वनंजे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्ह्यातून हजारो नागरिक देगलूर इथं उपस्थित होतेजवान सचिन वनंजे यांना अखेरचा निरोप देताना सर्वांच्या अश्रूचा बांधफुटलानांदेड मधील नागरिकांनी शोकाकुल वातावरणात सचिन वनंजे यांना श्रद्धांजली वाहत अखेरचा निरोप दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button