राजकीय

मुखेड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी १ लाख रुपये अनुदान द्या; शेकापतर्फे २ ऑक्टोबरला एकदिवसीय उपोषणाचा इशारा

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: २८ सप्टेंबर २६

शासनाने नुकतीच राज्यातील २६५ तालुक्यांची दुष्काळग्रस्त म्हणून घोषणा केली आहे; मात्रमराठवाड्यातील अत्यंत दुर्लक्षित व डोंगराळ भाग असलेल्या मुखेड तालुक्याला यातून वगळण्यात आलेआहे. शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून मुखेड तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १ लाख रुपये अनुदान व सर्व दुष्काळी सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. यासंदर्भात शेकापच्या शिष्टमंडळाने मुखेडच्या तहसीलदारांना अधिकृत निवेदन दिले आहे.

तहसीलदारांना सादर  केलेल्या निवेदना नुसार, मुखेड तालुका हा पूर्णपणे डोंगराळ भाग असून येथे पर्जन्यमानाचे प्रमाण अत्यंत कमी असते. तालुक्यातील सुमारे ८० टक्के शेती कोरडवाहू असल्याने निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका येथील बळीराजाला सहन करावा लागत आहे. अशा बिकट परिस्थितीतही शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून मुखेडला वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

शासनाने मुखेड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्यावी आणि दुष्काळग्रस्त भागासाठी असणारे सर्व शासकीय लाभ शेतकऱ्यांना मिळवून द्यावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २ ऑक्टोबर २०२६ रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळ शेकापतर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

या निवेदनावर शेकापचे जिल्हा चिटणीस ॲड. गोविंद डूमणे, भाई राजू पाटील सुरनर, राज्य मद्यवर्ती सदस्य भाई आसद बल्खी, शिवकुमार डावरगावे, सुभाष जयसिंग डूमणे, रामचंद्र पाटील हंबरबंडे, पांडुरंगजाधव, भाई पांडुरंग लंगेवाड, दिनेश पाटील केरूळकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. तात्काळ सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button