रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकांच्या हत्येचा गुन्हा उघडकीस, आरोपी अटक

मुखेड प्रतिनिधी:- १५ ऑगस्ट २५
मुखेड शहराजवळील तांदळी येथील एका युवकाचा रक्ताच्या थारोळ्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना दि १२ ऑगस्ट मंगळवार रोजी घडली होती. या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण पसरले होते. याघटनेतील आरोपीस उघडकीस आणून अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. दि १४ गुरुवार रोजी पोलीसांनी या घटनेतील आरोपीचा शोध घेऊन त्यांस अटक करून मुखेड पोलीस ठाण्यात त्याचे विरुद्धखुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील तांदळी येथील रहिवासी युवक बाबाराव बालाजी मेथे वय २७ वर्षे हा भाजीपाला व बाजार आणण्यासाठी मुखेड शहरात दि. ११ रोज सोमवारी आला. परंतुतो घरी परत न आल्याने त्याची शोधा शोध परिवारातील सदस्यांनी सुरू केली असता दि.१२ रोज मंगळवारी त्याचा नगरपरिषदेच्या फिल्टर पाणी टाकी समोर उमरदरी शिवारात रक्ताच्या थारोळ्यात अवस्थेत मृतदेह सापडला होता. या गुन्ह्याचा तपास करून आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते पोलिसांनी तपास सुरू केला असता तांदळी येथील युवक बाबाराव मेथे व बालाजी वर्धमान भालेराव राहणार कुंद्राळा कँप तालुका मुखेड येथील युवक हे दोघे शहरातील एका दारूच्या दुकानात बसून दारू पिली व दारूची बॉटल सोबत घेऊन शहरातील नगरपरिषदेच्या पाणी टाकी समोर उमरदरी शिवारात आडोशाला बसून पुन्हा दारू पित असताना त्या दोघात किरकोळ वादातून बाचाबाची झाली. बाचाबाची चेरूपांतर हाणामारीत झाले या हाणामारीत बालाजी भालेराव याने बाबाराव मेथे याच्या डोक्याला दगड मारला असता बाबाराव मेथे जमिनीवर खाली पडला व तो जमिनीवर पडल्याचे पाहून दुसरा मोठा दगडत्याच्या डोक्यात घातला यामध्ये बाबाराव मेथे हा जागीच मरण पावला. पोलिसांनी या घटनेचा तपासकरून आरोपीचा शोध घेऊन आरोपीस दिनांक १४ रोज गुरुवार रोजी उदगीर येथील व्यसनमुक्ती केंद्रातून आरोपी बालाजी वर्धमान भालेराव राहणार कुंद्राळा कँप तालुका मुखेड यास अटक करून त्याच्याविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, देगलूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनात मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक मंचक फड, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक संदीप यामावार, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतुरवाड, पो.हे.का. रवींद्र घुले. पांडुरंग पाळेकर, वीरभद्र पाटील, मधुकर गोन्टे, मन्मथ गोंड, यादव इबितदार, चालक गंगाधर जायभाये यांनी केला. या गुन्ह्याचा शोध करून आरोपीस अटक केल्याने तांदळी ग्रामस्थांनी पोलिसांचे कौतुक केले



