राजकीय

प्रभाग रचनेची प्रक्रिया दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता

पुणे :- ०८ जून २५

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी संदर्भात चार आठवड्यांत अधिसूचना जारीकरण्याच्या दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेतप्रभागरचनेसाठी राज्य सरकारला सूचनाही दिल्या आहेतत्यानुसार येत्या दोन दिवसात महापालिकेची प्रभागरचनेची प्रक्रिया जाहीर होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यात निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेतत्यानुसारराज्य शासनाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम ठरवला असूनत्यासंबंधीचे आदेश लवकरच जाहीर केले जातीलमहायुती सरकारने यंदाही चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

२०१७च्या महापालिका निवडणुकीतही हीच प्रणाली वापरण्यात आली होतीआता निवडणूक आयोगाने प्रभाग रचना पूर्ण करण्याची जबाबदारी पुन्हा राज्य सरकारवर सोपवली आहेत्यानुसार प्रभाग रचनेचीप्रक्रिया येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.

पावसाळ्याचा कालावधीमहापालिकाजिल्हा परिषदपंचायत समितीच्या एकत्रित निवडणुकाघेण्यासाठीची यंत्रणा या साऱ्यांचा विचार करावा लागणार आहेत्यासाठी न्यायालयाकडे काहीकालावधीची मागणी केली जाण्याची शक्यता आहेराज्य शासनाने चार सदस्यीय प्रभाग रचनेचे नवीनआदेश दिलेतर त्यासाठी रचनाआरक्षणमतदार यादी तयार करणे यासाठी तीन महिन्यांचा अवधीलागणार आहेजूनमध्ये आदेश दिले तर तेव्हापासून ऑक्टोबर पर्यंत ही प्रक्रिया होईलत्यामुळे पुढील 45 दिवसांत म्हणजे ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मतदान होऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button