Uncategorized

जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूल मध्ये राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस साजरा

मुखेड / प्रतिनिधी:- 

  राष्ट्रीय दंत चिकित्सक दिन  जागतिक महिला दिना निमित्य मुखेड येथिल श्रीरामे डेंटल हॉस्पिटलच्या वतिने वैद्यकीय संस्थेचे माजी सचिव दंतरोगतज्ञ डॉ.पांडुरंग श्रिरामे,डॉ.जावेद शेख यांनी मुखेड शहरातील पिएमश्रीआदर्श शाळा,जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूल मधिल २८६ विद्यार्थ्यांना दंत  मुख आरोग्याच्या संदर्भात मार्गदर्शन करुन सर्वांची दंततपासणी करण्यात आली.याप्रसंगी प्रशालेच्या वतीने डॉ .श्रीरामे  डॉ .शेख यांचा सत्कार करण्यात आले.

लहान मुलांच्या दातांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहेकारण त्यांचे दात नाजूक असतात आणि भविष्यात दातांच्या आरोग्यावर त्याचा प्रभाव पडतोयामुळे लहान वयात त्यांच्या दातांची योग्य काळजी घेतल्यास पुढील काळात चांगले दंत आरोग्य टिकवता येते असे प्रतिपादन दंतरोगतज्ज्ञ डॉपांडुरंग श्रीरामे यांनी मुखेड येथील जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूल मुखेड येथे केले.

     यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब कदमजि..मुलींचे हायस्कूलचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेताब शेख,केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण,पर्यवेक्षक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख दिलीपराव देवकांबळेशिवसमर्थ पतपेढीचे चेअरमन तथा माजी केंद्रप्रमुख मधुकर गायकवाडकेंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बालाजी बनसोडेशिक्षक नेते दिपक लोहबंदेसहशिक्षिका मधुमती लोणीकरसहशिक्षक नागनाथ स्वामीनवनाथ खांडेकर,हरी भालेरावसंगीता धनशेट्टीसुनिता पाटीलसरस्वती मुपडे,एस.एलतांबोळी,पंढरी भालेराव,हरी पवार,प्रकाश डोईजड,व्यंकटी केंद्रे,भवाणीसिंह चौव्हाणअकबर सय्यद,हरीबाई केळे सह शाळेतील शिक्षक,शिक्षिकाशिक्षकेत्तर कर्मचारी  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button