राजकीय

मुखेड-कौठा-नांदेड महामार्गसावधान,प्रशासन गुत्तेदार लोकप्रतिनिधी झोपले आहेतकाँग्रेसचे अनोखे फलक युद्ध

मुखेड /प्रतिनिधी दि.०९ एप्रिल २५
मुखेड कौठा नांदेड राष्ट्रीय महामार्ग निकृष्ट बांधकाम चर्चेत असतानाच चालू बांधकामावर कुठेच फलक नसल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सावधान वाहने जपून चालवा कारण बांधकाम प्रशासन गुत्तेदार आणि या भागाचे लोकप्रतिनिधी झोपले आहेत’ असे अनोखे फलक काँग्रेस कडून लावून निषेध केला आहे.
नांदेड-मुखेड – बिदर या राष्ट्रीय महामार्गावर मुखेड नांदेड दरम्यान अतिशय निकृष्ट बांधकाम झाले असून राष्ट्रीय महामार्गाचे कुठलेही निकष हे बांधकाम पूर्ण करत नाही. मुखेड नांदेड सर्वात जवळचा मार्ग म्हणून या मार्गाने जाताना वाहनधारक व प्रवासी प्रचंड मनस्ताप सहन करत आहेत. शिवाय 2018 पासून सुरू असलेले हे 161अ हे राष्ट्रीय महामार्ग अजूनही अधुरे आहे. अधुरे आणि पूल बांधकाम चालू असल्या ठिकाणी वळण रस्त्याचे किंवा सावधानीचे कसलेच फलक कंत्राटदारांकडून लावण्यात आले नसल्याने अनेक अपघात होत आहेत. बांधकाम प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे कसलेच नियंत्रण सदर महामार्ग कंत्राटदारांवर नसल्याचे दिसत आहे त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.श्रावण रॅपनवाड यांच्या संकल्पनेत व काँग्रेस जिल्हा प्रवक्ते दिलीप कोडगिरे, काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंदरीकर आणि काँग्रेस सेवा दल प्रदेश सचिव अण्णासाहेब जाहीरे यांच्या नेतृत्वात मुखेड कौठा नांदेड महामार्गावर पूल बांधकाम ठिकाणी ‘सावधान, आपली वाहने जपून चालवा महामार्गाचे काम संथ व अधोगतीने चालू आहे… कारण प्रशासन गुत्तेदार आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी पैसे घेऊन झोपले आहेत’ असे जागोजागी फलक लावले आहेत. यावेळी डॉ श्रावण रॅपनवाड, दिलीप कोडगिरे, संभाजी पाटील उंदरीकर, अण्णासाहेब जाहीरे यांसह इम्रान पठाण केतन मामडे एम.आर.गोपनर कोंडीबा वळगे,दिलीप बाजगीरे, जगन्नाथ पवित्रे, गंगाधर गडमळे आदीसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button