नांदेड जिल्ह्याला मिळाले नवे सिंघम; डॉ. नीलाभ रोहन यांनी स्वीकारला पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार

▫️हिंगोलीतील ऐतिहासिक व धडाकेबाज कामगिरी
नांदेड (विशेष प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ २३ जून २६
नांदेड जिल्हा पोलीस दलाला अधिक बळकट आणि शिस्तबद्ध करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हिंगोली जिल्ह्यातील आपल्या अल्पशा कार्यकाळात गुन्हेगारांचे कंबरडे मोडणारे धडाकेबाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी डॉ. नीलाभ रोहन यांची नांदेडचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला आहे. जून२०२६ च्या ताज्या प्रशासकीय बदल्यां नुसार त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि कठोर निर्णयक्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या डॉ. नीलाभ रोहन यांच्या आगमनाने नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतात मोठी खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली असून सर्वसामान्य जनतेतून मात्र या नियुक्तीचे जोरदार स्वागत होत आहे.
डॉ. नीलाभ रोहन हे २०१६ च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत. मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेल्या डॉ. रोहन यांचे शिक्षण बी.एस्सी. (विज्ञान शाखा) मधून झाले आहे. यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे दहशतवाद विरोधी पथक चे पोलीस अधीक्षक म्हणून अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.
२३ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. अवघ्या ६ महिन्यांच्या अत्यंत कमी कार्यकाळात त्यांनी हिंगोलीत जी कामगिरी केली, ती ऐतिहासिक मानली जाते:
“जनतेची सेवा, कायदा व सुव्यवस्था हीच आमची प्राथमिकता” असा संदेश देत डॉ. नीलाभ रोहन यांनी गुन्हेगारांना थेट इशारा दिला आहे. त्यांच्या या सिंघम स्टाईल कार्यपद्धतीमुळे नांदेड जिल्हा येत्या काळात पूर्णपणे गुन्हेगारी मुक्त होईल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.



