मुखेड-कंधार मतदारसंघातील २९३ दिव्यांग – वयोवृध्द मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क तर १ हजार ३३१ टपाली मतदान

मुखेड प्रतिनिधी:-
मुखेडः मुखेड–कंधारविधानसभा मतदारसंघात होऊ घातल्या लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग व ८५ वर्षावरील (वयोवृद्ध) २९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर निवडणूक कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी१२ ते १६ नोव्हेंबरपर्यंत १ हजार ३३१ यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणुकनिर्णय अधिकारी अनुप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश जाधव यांनी दिली.
मुखेड–कंधार विधानसभा मतदारसंघात सर्व नागरिकांनी मतदान करावे, यासाठी निवडणूकविभागाच्यावतीने मतदानाविषयी विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे. या अनुषंगाने १७ नोव्हेंबररोजी निवडणूक विभागाच्या स्वीप कक्षामार्फत तालुक्यातील कोळगाव येथे प्रत्येक घरोघरी जाऊन मतदानजनजागृती करून सर्वांनी २० नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे आव्हान करण्यातआले आहे. त्यासोबत जनजागृती मध्ये ‘मी मतदान करणारच‘ या घोषवाक्य समोर मतदारांची स्वाक्षरी घेतमतदार जनजागृती करण्यात आली आहे.
सदरील मतदान जनजागृती अभियान हे निवडणुक निर्णय अधिकारी अनुप पाटील, सहाय्यक निवडणूकनिर्णय अधिकारी राजेश जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी चव्हाण, निवडणुकविभागाचे नायब तहसीलदार जोहरे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार विलास तेलंग, गट विकासअधिकारी सी. एल. रामोड, गट विकास अधिकारी पाटील, गट विकास अधिकारी महेश पाटील, लिपीकप्रशांत लिंबेकर, महाडीवाले, एस. डी. कुसुमकर, देशमुख तलाठी, स्वीप कक्ष प्रमुख एस. एस. करेवाडमुजावार सर, एन. एस. होनराव, राजु सुवर्णकार, सतिष बेदरकर, मिडीया कक्ष प्रमुख उत्तम नारलावार, शिवशंकर कुच्चेवाड, संजय येनुरवार, रफिक बागवान काम करीत आहेत.



