क्राईम

नांदेडमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास थेट गुन्हा दाखल; पोलिसांचा इशारा

नांदेड | २५ जून २५
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करणाऱ्यांविरोधात नांदेड पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राइव्ह’ आणि ‘दामिनी पथक’ यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत २१ जणांविरोधात थेट गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात आली आहे.

ही मोहीम नांदेड शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत राबवण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांविरोधात ही विशेष मोहीम होती. यासोबतच बेशिस्त वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, दारूविक्री करणाऱ्या ठिकाणांचीही तपासणी करण्यात येत आहे.

पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, शांतता भंग करणे किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वर्तनाला यापुढे माफ केले जाणार नाही.

नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि सार्वजनिक जागांमध्ये शिस्त पाळावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button