मुखेड तालुक्यातील १२१ ग्रामपंचायत साठी सरपंच पदांचे आरक्षण जाहीर

मुखेड प्रतिनिधी :- २६ जून २५
मुंबई ग्रामपंचायत सरपंच निवडणूक नियम १९६४ मधील नियम २ (अ) २ अन्वये शासन ग्रामीण विकासविभागाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी नांदेड यांच्या पत्रानुसार मुखेड तालुक्यातील१२१ ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० या कालावधीतील पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंच पदांचेआरक्षण निश्चित करण्यात आले आहे. आरक्षण प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पारपाडण्यासाठी दि. १ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय, मुखेड येथे आरक्षण सोडतकाढण्यात येणार आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, निवडणूक अधिकारी, व संबंधितविभागीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मुखेड तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातींसाठी १५, अनुसूचित जमातींसाठी ४, इतरमागासवर्गीयांसाठी ३५ व खुल्या प्रवर्गासाठी ६७ सरपंच पदे आरक्षित करण्यात आली आहेत. त्यापैकीमहिलांसाठी अनुक्रमे ७, २, १८ व २९ जागा आरक्षित आहेत. आरक्षण प्रक्रियेबाबत ग्रामस्थांनी मोठ्याप्रमाणावर उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार राजेश जाधव यांनी केले आहे



