आरोग्य

डॉ. शंकर मुगावे यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘आउटस्टँडिंग लीडरशिप अवॉर्ड’ प्रदान

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क, मुखेड:- २७ ऑक्टोंबर २६

 वैद्यकीय सामाजिक कार्य, संशोधन आणि रुग्णसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. शंकर मुगावेयांना प्रतिष्ठेच्या ‘Outstanding Leadership Award – 2026’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितकरण्यात आले आहे.

आसाममधील गुवाहाटी येथील ‘Assam down town University’ मध्ये ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबररोजी झालेल्या AIAMSWP च्या राष्ट्रीय परिषदेत AIIMS गुवाहाटीचे संचालक डॉ. अशोक पुराणिक वविद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या परिषदेत त्यांनी थॅलेसेमियाव्यवस्थापन आणि स्वैच्छिक रक्तदानाच्या महत्त्वावर आपले महत्त्वपूर्ण संशोधन सादर केले. तसेच, AIIMS दिल्लीच्या संशोधन सत्रात अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली.

‘शतकवीर रक्तदाता‘ म्हणून त्यांचे योगदान आणि ससून रुग्णालयाच्या समाजसेवा विभागामार्फत गरजूरुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी त्यांनी राबविलेल्या उपक्रमांचेही या परिषदेत विशेष कौतुककरण्यात आले. डॉ. मुगावे यांचा हा सन्मान रुग्णसेवा, रक्तदान आणि सामाजिक कार्यासाठी अत्यंतप्रेरणादायी ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button