8 नोव्हेंबर रोजी मुखेड मतदारसंघ उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी

मुखेड प्रतिनिधी :-
91- मुखेड मतदारसंघातील उमेदवारांच्यानिवडणूक खर्चाची प्रथम तपासणी शुक्रवारी 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीतआयोजित केली आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगानेकेलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
तहसील कार्यालय, मुखेड पहिला मजला येथे खर्च निरिक्षकांसमोर उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचीतपासणी करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्यावेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वतः किंवा त्याच्या, तीच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीलानामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यतदोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्वखर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे.
या तपासणीस अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्यापरिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व दाखल करण्याच्याकायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यासलोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्याकालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल यांची नोंद घ्यावी असे 91-मुखेड विधानसभा मतदार संघाचेनिवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे



