राजकीय

मुखेड तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींवर महिलाराज; आरक्षण सोडत जाहीर

मुखेड प्रतिनिधी:- ०१ जुलै २५

तालुक्यातील १२९ ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण दि. जुलै २०२५ रोजी जाहीर करण्यातआलेग्रा.पं.सरपंच पदाच्या ६६ जागी महिला तर ६३ जागी पुरुषांसाठी आरक्षण सोडत निघाली आहेहा ग्रा.पं.सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम मुखेड तहसिल कार्यालयात आयोजित करण्यातआला होताउपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोडत प्रक्रिया पार पडलीनांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याकडून प्राप्त परिपत्रकानुसार मुखेड तालुक्यातील १२९ ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहेटक्केवारीच्या उतरत्या क्रमाने हे आरक्षण काढण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार राजेश जाधव यांनी दिली.


अनुसुचित जातीसाठी २९ जागा असून त्यापैकी १५ जागांवर महिलांना प्रतिनिधीत्व मिळणार आहेअनुसुचित जमातीसाठी  जागा आरक्षित असुन त्यापैकी  जागा महीलांसाठी आरक्षित करण्यात आल्याआहेतइतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसीसाठी २८ जागा आरक्षित आहेतत्यापैकी १४ जागा महिलासरपंच साठी आरक्षित आहेतखुल्या प्रवर्गासाठी ६५ जागा असून त्यापैकी ३३ जागा महिलांसाठीआरक्षित करण्यात आल्या आहेत.

यावेळी उपविभागीय अधिकारी अनुप पाटीलतहसिलदार राजेश जाधवपी.आय.आर.बी.शेंडगे,नायब तहसिलदार एस.एस.मामीलवाडनायब तहसिलदार सतिष जोहरेमंडळ अधिकारी जी.बी.कोनुलेमहसुल सहाय्यक प्रशांत लिंबेकरतलाठी एस.के.देशमुख,तलाठी सय्यद इरफान,तलाठी व्हि.एल.दुगलवाडऑपरेटर बबलु आतार,


कोतवाल गणेश बंडे यांच्यासह तालुक्यातील नागरीक ग्रा.पं.सरपंच पदाच्या आरक्षण सोडत कार्यक्रमातमोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button