सामाजिक

डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी आक्रमक; मुखेड-लातूर महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन!

मुख्यालय प्रतिनिधी, मुखेड:

मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असतानाचगेल्या काही दिवसांपासून परिसरात डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवत आहेहक्काचे डिझेल वेळेवर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज अचानक  मुखेडलातूर महामार्गावर एकत्र येत जोरदार १५ मिनिटरास्ता रोको‘ आंदोलन केलेशेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

सध्या तालुक्यात मान्सूनपूर्व शेती कामांची लगबग सुरू आहेशेतकरी पेरणीपूर्व मशागतनांगरणी आणि वखरणीच्या कामात व्यस्त आहेतआधुनिक शेतीमध्ये ट्रॅक्टरडिझेल पंपसेट आणि इतर स्वयंचलित शेती अवजारांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातोत्यामुळे सध्या डिझेलची मागणी प्रचंड वाढली आहे.

परंतुस्थानिक पेट्रोलपंपांवर डिझेलचा पुरवठा सुरळीत होत नसल्याचे चित्र आहेडिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आपला शेतीचा महत्त्वाचा वेळ सोडून तासनतास पंपावर रांगा लावाव्या लागत आहेतएवढे करूनही डिझेल मिळेलच याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आज सकाळच्या सुमारास डिझेल  मिळाल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि त्यांनीथेट मुखेडलातूर महामार्ग अडवून धरलाअचानक झालेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनावाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्याघटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतलीशेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेत डिझेल पुरवठा सुरळीतकरण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आणि महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.

परंतुआगामी दोनचार दिवसांत डिझेलचा पुरवठा सुरळीत झाला नाहीतर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुक्यातील बळीराजाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button