सामाजिक
स्वाधार शिष्यवृत्तीसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे व नोटरीसेवा केवळ १० रुपयात करून देण्याचा निर्णय.

▫️मुखेड ऑल इंडिया लॉयर्स युनियन वकील संघाचा स्त्युत्य उपक्रम.
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- २५ नोव्हेंबर २६
मुखेड तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य कुटुंबांना अनेक समस्या व आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे.या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे थांबू नये आणि शिष्यवृत्तीच्या प्रक्रियेत आर्थिक भारामुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये या सामाजिक जाणिवेतून ऑल इंडिया लॉयर्स युनियन वकील संघ मुखेडतर्फे सामाजिक उपक्रम राबविण्यासंदर्भात पुढाकार घेतला आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक असलेली प्रतिज्ञापत्रे व नियमानुसार नोटरी सेवा केवळ १० रुपये नाममात्र शुल्कात करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आयोजकाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
दुष्काळामुळे तालुक्यात पालकांच्या हाताला काम नाही,उत्पन्नाची शाश्वती राहीली नाही मात्र अशा कठीण परिस्थितीतही आपल्या मुलांनी शिकावे, मोठे व्हावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे,हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते पण सर्वसामान्य कुटुंबातील शेतमजुर,कामगार,कष्टकरी मजुरांना आर्थिक अडचणीमुळे दुष्काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्चाचा भार उचलने त्यांना शिक्षण देणे शक्य होत नाही म्हणून आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गोरगरिबांच्या लेकरांचे शिक्षण थांबू नये तसेच शिष्यवृत्ती प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये या उद्देशाने सामाजिक बांधिलकीतून सामाजिक जाण ठेवत ऑल इंडिया लॉयर्स युनियन वकील संघ मुखेड शाखेतर्फे यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.आणि विध्यार्थ्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारी आवश्यक असलेली प्रतिज्ञापत्रे व नियमानुसार नोटरी सेवा केवळ १० रुपये नाममात्र शुल्कात करून देण्याचा निर्णय सदरील वकील संघटनेतर्फ घेण्यात आला आहे.तरी मुखेड तालुक्यातील सर्व विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाची नोंद घेवुन लाभ घ्यावा.कारण दुष्काळाने पिके कोमेजली तरी विद्यार्थ्यांची स्वप्ने कोमेजता कामा नयेत, शिक्षणाची वाट आर्थिक अडचणींमुळे थांबता कामा नये यासाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ऑल इंडिया लॉयर्स युनियन वकील संघाचे मुखेड अध्यक्ष ॲड.गजानन गोपतवाड,ॲड. अंतेश्वर गोगे,उपाध्यक्ष ॲड. बाबाराव वाघमारे,ॲड. गजानन हिवराळे,ॲड. हणमंत होट्टे,ॲड.प्रज्ञावंत गायकवाड,ॲड.राहुल सोनकांबळे,ॲड.शंकर बादावाड सह संघाच्या पदाधिकाऱ्यानी दिली आहे.



