Uncategorized

मुखेड तालुक्यात कृषी विभागाच्या आशीर्वादाने युरिया खताची कृत्रिम टंचाई; शेतकरी हवालदिल

मुखेड : प्रतिनिधी ०९ जुलै २५ 

मुखेड तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहेआणि यात कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेतखत विक्रेते जादा दराने खते विकत आहेत आणि काही ठिकाणीखतासोबत इतर खते घेण्याची सक्ती केली जात आहेयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे

मागील काही दिवासांपासून कृषी सेवा केंद्र चालकांकडून वेगवेगळी कारणे देऊनयुरियाची कृत्रिमटंचाई निर्माण केली जात आहेमात्रकृषी केंद्र चालकांना राजकीय पाठबळ असल्यामुळे कोणतीहीठोस कारवाई झाली नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गुरुवारी अनेक दुकानात फिरूनही युरिया मिळाला नाहीखरेदी विक्रीसंघाचे कार्यालयात युरिया नसल्याने शेतकरी हैराण झालेल्या चित्र मोंढ्यात पाहावयास मिळत आहे.

युरिया खताचा भाव २६५ रुपये असून सध्या ५०० एम एल लिक्विड युरिया उपलब्ध असून त्यांची किंमत२२५ आहेठोक विक्रेते किरकोळ व्यापारी दुकानदारांना पाहिजे असल्यास लिंकिंग नॅनो युरिया घेतल्यास आम्ही युरिया तुम्हाला देऊ या भूमिकेत आहेतशहरातील ठोक व्यापारी बफर स्टॉक केल्याने मोढ्या येथील एकूण २५ कृषी सेवा केंद्रापैकी फक्त दोनच दुकानात युरिया उपलब्ध आहेतर २३दुकानात तब्बल  महिन्यापासून युरिया सामान्य शेतकऱ्यांना मिळत नाही.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यानो युरिया शेतकऱ्यांनी घेण्यासाठी शहरात युरिया खताचा भाव २६५रूपये तर बाराहाळी रस्त्यावर  बेरळी रस्त्यावर असलेल्या वेअर हाऊसमधील स्टॉक असलेल्या युरियाखत बाहेर जिल्ह्यातील जळकोटजांबउदगीरदेगलूर येथे ४०० रुपये दराने खुलेआम विक्री चालू आहे

काही खत विक्रेते युरिया खताची जादा दराने विक्री करत आहेतआणि काही ठिकाणी खतासोबत इतरखते घेण्याची सक्ती केली जात आहे या विषयाकडे तहसीलदारकृषी अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे.

गावोगाव प्रचार  माहिती देणेआवश्यक असताना पंचायत समितीकार्यालयात कृषी विभाग  तालुकाकृषी अधिकारी हे उंटावरून शेळ्या हाकत आहेततालुका खरेदी विक्री एक खत नाही संघात दोन ट्रकयुरिया उपलब्ध झाला होतापण चार दिवसांत युरिया खताची विल्हेवाट लावण्यात आल्याची माहितीमिळाली आहे.

खरेदी विक्री संघात सरसकट सातबारा घेऊन वाटप करणे आवश्यक असताना तोंड पाहून युरिया मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button