येवती येथे १० जानेवारी रोजी जंगी कुस्तीचा सामना !

मुखेड ता. प्रतिनिधी ०८ जानेवरी २६
मुखेड तालुक्यातील तिर्थक्षेत्र लघु आळंदी म्हणून ओळखले जाणाऱ्या परम पूज्य श्री सद्गुरू नराशाम महाराज यांत्रे निमित्य दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दि. १० जानेवारी २०२६ रोजी यात्रा कमेटी व समस्त गावकऱ्यांच्या वतीने पारंपरिक जंगी कुस्त्यांच्या सामन्याचे आयोजन केले असून शेवटची कुस्ती ११ हजार रुपयांची ठेवण्यात आली आहे.
नांदेड जिल्हा व परिसरातील पैलवानानी दि. १० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता कुस्तीच्या सामन्यात भाग घेण्यासाठी हजर राहावे आवाहन परम पूज्य श्री सद्गुरु नराशाम महाराज यात्रा कमेटी व समस्त गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. कुस्त्याच्या सामन्यात हार जीत मध्ये काही वाद निर्माण झाल्यास अंतिम निर्णय पंच कमेटीचा असेल तरी आजुबाजूच्या परिसरातील पैलवानानी व कुस्तीप्रेमीनी या कुस्ती सामन्याचा आनंद घ्या असे यात्रा कमेटीकडून कळविण्यात आले आहे.



