आर्थिक

विद्युत शॉक लागून बैलाचा मृत्यू; कोळपणी करताना विद्युत पोलचा घात

किनवट/कोसमेट १७ जुलै २५

शेतात कोळपणी करताना लोखंडी विद्युत पोलमध्ये उतरलेल्या विजेमुळे बैलाला शॉक लागून जागीचमृत्यू झाल्याची घटना दि १६ जुलै रोजी अंदाजे ११.३० च्या सुमारास घडली. शेतकरी आनंद साखरे यांच्या शेतात शेजारील शेतकरी बालाजी वाघमारे यांचा बैल कोळपणीसाठी आणण्यात आला होता.

विद्युत पोलच्या अर्थिंग तारेला स्पर्श झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली.महावितरणच्या हलगर्जी पणामुळेच बैलाचा मृत्यू झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

घटनेनंतर पोलीस आणि महावितरण अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असला तरी शेतकऱ्यांच्या पोटाचीभूूक भागवणारा बैल गमावल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

परिसरातील शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत लाईनचे तारे लोंबकळत असून यापासून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने विद्युत वितरण कंपनीने इस्लापूर भागातील सर्वच गावातील शेती मधील लोंब कळणारी विद्युत तारे व त्याच्यापासून होणारा धोका उद्भभवू नये यासाठी पावले उचलावीत अशा स्वरूपाची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button