राजकीय

छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे  यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुखेडात रास्ता रोको आंदोलन

मुखेड प्रतिनिधी:- २२ जुलै २५

छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्या वर झालेला भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुखेड तालुक्यातील मराठा समाज,सामाजिक संघटना  शेतकरी बांधवांच्या वतीने सोमवारी दि २१ जुलै रोजी भव्य रास्ता रोको आंदोलन  घोषणा देत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण  सोबतच्या साथीदारांनवर कारवाई करण्याचे निवेदन  मुखेड येथील तहसीलदार राजेश जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्री  अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना  देण्यात आले आहे यावेळी शिवसेना ,बाठागटाचे उपजिल्हाप्रमुख  भालचंद्र नाईक ,संभाजी ब्रिगेड

 तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील हसनाळकर,शिवसेनेचे तालुकाप्रमुख उमेश पाटील आलूरकर ,राजमुद्रा चे संस्थापक  अध्यक्ष सचिन पाटील इंगोले  ,शेतकरी पुत्र बालाजी पाटील ढोसणे  ,युवक काँग्रेस सचिव तुकाराम पाटील सुडके ,शिवसेना .बाटा.गटाचे  शहर प्रमुख शंकर चिंतमवाड ,संभाजी ब्रिगेडचे तालुका सचिव सदाशिव पाटील गोजेगावकर,छावा उपजिल्हाप्रमुख सूर्याजी पाटील शिंदे ,

छावा तालुका अध्यक्ष गिरीधर पाटील केरूरकर, युवाव्याख्याते अविनाश पाटील इंगळे ,बजरंग पाटील पाळेकर, आनंद पाटील ,माधव पाटील ,बालाजीपाटील ,बोडके बजरंग जांभळीकर, गोविंद पाटील टेकाळे ,बालाजी पाटील शिंदे ,धम्मानंद जोंधळे,कपिल काठेवाड ,दामोदर गाढवे श्रीकांत शिंदे ,आनंद पाटील खंडागळे ,संतोष पाटील इंगोले  अन्यसर्व पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button