स्वच्छतेची शपथ घेऊन मुखेड शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम

▫️तहसीलदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व नगर परिषद,सफाई कर्मचारी , नागरिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ
मुखेड प्रतिनिधी:- १३ ऑगस्ट २५
स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने मुखेड तहसील कार्यालय व नगर परिषद मुखेड यांच्या संयुक्तविद्यमाने दि.१२ ऑगस्ट २५ रोजी स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात तहसील कार्यालयाच्या प्रांगणात स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली. यावेळी तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह अधिकारी कर्मचारी, नगर परिषद पदाधिकारी, सफाई कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले.

शपथ विधीनंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बाजारपेठ परिसर, तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्लास्टिक, कचरा, गवत व इतर घाण काढून परिसर स्वच्छ व आकर्षक करण्यात आला या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.

तहसीलदार राजेश जाधव, महसूल कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी यांनी झाडू, कचऱ्याच्या पिशव्यायांचा वापर करून स्वच्छतेत सक्रिय सहभाग नोंदविला. नागरिकांनाही आपल्या घरासमोरील आणिसार्वजनिक जागांमधील स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले




