Uncategorized

शिक्षकांच्या प्रलंबित विविध मागण्यासाठी शिक्षक परिषदेचे 15 सप्टेंबर रोजी ढोल बजाओ आंदोलन


नांदेड प्रतिनिधी:- दि.१२ सप्टेंबर


नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न संदर्भात व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊनही जिल्हा परिषद प्रशासनाने एकही प्रश्न सोडवलेला नाही
हे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यात यावेत अशा प्रकारचे निवेदन चार सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना देऊन निकाली काढण्याची मागणी करण्यात आलेली होती परंतु प्रशासनाने कुठलीही प्रश्न निकाली काढलेले नाहीत म्हणून १५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी एक वाजता जि प प्रशासनाच्या पुढे ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड व कार्यवाह प्रल्हाद राठोड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे..
ढोल बजाओ आंदोलन संघटनेचे प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे,राज्य संघटन मंत्री सुरेश दंडवते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे
जिल्ह्यातील शिक्षकांची वेगवेगळी शैक्षणिक कामे प्रलंबित असल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक हे शिक्षण विभाग व वित्त विभागांमध्ये वारंवार हेलपाटे घेत आहेत याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्ता विकासावर होत आहे तसेच अशैक्षणिक कामे कमी करावीत आणि जिल्हा अंतर्गत बदल्या झालेल्या सर्व शिक्षकांना नवीन शाळेत रुजू होण्यासाठी कार्यमुक्त होण्यासाठी आदेश निर्गमित करावेत,जिल्हा शिक्षक पुरस्कार व तालुका शिक्षक पुरस्कार सप्टेंबर महिन्यात घेऊन शिक्षकांना सन्मानित करावे, जिल्ह्यातील फार मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख पदोन्नत मुख्याध्यापक माध्यमिक शिक्षक विषय शिक्षक ही पदोन्नतीची पदे शासन निर्णयानुसार पदोन्नतीने समुपदेशन आणि भरण्यात यावीत इयत्ता सहावी ते आठवी या वर्गासाठी अध्यापन करणाऱ्या विशेष शिक्षकांची 2019 पासून प्रलंबित असलेली वेतन श्रेणी लागू करावी,सलग 12 वर्ष व 24 वर्ष एकाच पदावर कार्यरत असल्या शिक्षकांना चट्टोपाध्याय व वरिष्ठ हे लागू करावी,भविष्य निर्वाह निधी विवरण पत्रातील त्रुटी दुरुस्त करून विवरणपत्र ऑनलाईन उपलब्ध करून द्यावे,डीसीपीएस धारकाच्या कपातीच्या रक्कमा त्यांच्या खात्यावर जमा करावी सेवानिवृत्त पेन्शन धारकांचे प्रस्ताव जलद गतीने निकाल काढून त्यांना मिळणारे सर्व लाभ त्यांच्या खात्यावर जमा करावेत, जिल्ह्यातील शिक्षकांचे वैद्यकीय देयके अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत ते विना विलंब निकाली काढावेत.महाराष्ट्र शासनाच्या राबविण्यात येत असलेला निपून महाराष्ट्र अभियान वगळता इतर कोणतेही अभियान त्याचा उपक्रम राज्य शासनाच्या परवानगी शिवाय जिल्ह्यात राबवू नये,जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षकांची सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात यावी,जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भौतिक सुविधा व शैक्षणिक साहित्याची प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे अशा शाळांना त्वरित अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशैक्षणिक कामे कमी करून शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढीसाठी वेळ उपलब्ध करून द्यावा,जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या प्रक्रियेतील संवर्ग एक मधील शिक्षकांची शासन निर्णयानुसार शारीरिक तपासणी करण्यात यावी या व इत्यादी मागण्या साठी जिल्हा परिषदेच्या पुढे ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे.
अशोक पाटील बावणे शिक्षक नेते दत्तप्रसाद पांडागळे राज्य प्रवक्ते संजय कोठाळे विभागीय अध्यक्ष बालाजी पाटील बामणे विभागीय कार्याध्यक्ष अजित केंद्रे राजेंद्र पाटील माळेगावकर गणू जाधव दिगंबर पाटील कुरे संभाजीराव आलेवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे..
म्हणून जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनींनी हजारोच्या संख्येने या ढोल बजाओ आंदोलनात मोठ्या संख्येने अर्ध्या दिवसाची रजा घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड,कार्यवाह प्रल्हाद राठोड, कोषाध्यक्ष बाळासाहेब पांडागळे, जिल्हा कार्यालयीन मंत्री बळवंत मंगनाळे,संघटन मंत्री संतोष साखरे,संजय मोरे,जिल्हा प्रवक्ते रवी ढगे,विश्वनाथ पाटील ,संतोष देशमुख ,नरसिंग एंड्रलवार, बालाजी पाम्पटवार, शिवराज साधू ,शंकर बेळकोने, चंद्रकांत गौंड ,मारुती गीते ,वैजनाथ मिसे ,गिरीश गरुडकर, रंगराव बारसे ,बालाजी राऊतवाड ,पांडुरंग दिनकर ,व्यंकट संभाजी ,पावडे रंगारी ,भास्कर बोलले ,हनुमंत काऊलवार ,गोविंद श्रीकांत मुक्कनवार इत्यादींनी केले आहे.
असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश पाटील व विठ्ठल मुखेडकर यांनी कळविले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button