Uncategorized

श्रीरामे डेंटल हॉस्पिटल तर्फे वसतीगृहातील १२० विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी

मुखेड (प्रतिनिधी) – ३० जुलै २५

छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान  छत्रपती गणेश मंडळदिप नगर मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत दंत तपासणी शिबिरात मुखेड शहरातील  शाहिर अण्णा भाऊ साठे माध्यमिक  उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या दलित वर्ग संघ वसतीगृहातील सुमारे १२० ग्रामीण  सामाजिकदृष्ट्या वंचितविद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आलीहा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्य जागृतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक माबालाजी वडजे होतेतर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक माप्रकाश चल्लावारतसेच शहरातील प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ डॉपांडुरंग श्रीरामे  डॉजावेद शेख हे उपस्थित होते.शिबिरात वसतीगृहात राहणाऱ्या वाडीवस्त्या तांड्यांवरील विद्यार्थ्यांची सखोल दंत तपासणी करण्यात आलीतपासणीनंतर प्रत्येक विद्यार्थ्याला मंडळाच्या वतीने टूथब्रश  टूथपेस्टचे मोफत वाटप करण्यात आले.

     प्रारंभिक मनोगतात माप्रकाश चल्लावार यांनी दंतरोगांचे गांभीर्य  त्यावरील प्रतिबंधक उपायया विषयी मार्गदर्शन केलेत्यानंतर प्राचार्य वडजे यांनी मंडळाच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करतम्हणाले की, “ही केवळ तपासणी नव्हेतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

डॉपांडुरंग श्रीरामे यांनी विद्यार्थ्यांना तोंड  दातांचे आरोग्यस्वच्छता आणि विविध आजारांवरील उपाययांची माहिती प्रात्यक्षिकासह दिलीकाही विद्यार्थ्यांसाठी पुढील उपचारही त्यांनी मोफत करण्याचे आश्वासन दिले.

     या उपक्रमात छत्रपती गणेश मंडळाचे अध्यक्ष विनोद पाटीलउपाध्यक्ष सचिन मेनकुदळेसचिव प्राडॉशंकर सकनुरेसदस्य वैभव इंगळेविद्यालयाचे सहशिक्षक सुधीर लांडगे  वसतीगृह व्यवस्थापक सूर्यकांत काष्टेवाड यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष तळेगावे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षक बाबु पवळे सर यांनी केले.

     हा उपक्रम म्हणजे केवळ एक आरोग्य तपासणी नव्हेतर समाजातील वंचित घटकांप्रती जबाबदारीचीजाणीव ठेवणाऱ्या गणेश मंडळाची सामाजिक बांधिलकी दर्शवणारे स्तुत्य उदाहरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button