नांदेड जिल्ह्यात प्रथमच आढळली मगर; वनविभागाच्या पथकाला मगर पकडण्यास आला यश.

लोहा तालुक्यातील घोटका येथील शेतात मगर आढळून आल्याने खळबळ उडाली
मुखेड (नांदेड) प्रतिनिधी:-
मुखेड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या लोहा तालुक्यातील घोटका येथील शेतात दि ११ फेब्रुवारी २५ रोजी मंगळवारी पहाटे १ वाजेच्या दरम्यान दीड वर्षाची नर जातीची मगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे .
माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने मगरीस शेतातून पकडले आहे. मात्र, शेतात अचानक मगरआढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नांदेड जिल्ह्यात प्रथमच मगर आढळूनआल्याची माहिती आहे.
घोटका येथील शेतकरी शेषेराव यादव कदम यांच्या शेतात मगर आढळल्याची माहिती सरपंच संग्राम सुरनरयांनी वनपाल धोंडगे यांना मंगळवारी पहाटे दिली. वनपाल शंकरराव धोंडगे, वनरक्षक अरुण राठोड वसर्पमित्र सिद्धार्थ कांबळे, नादान शेख यांनी लागलीच शेतात धाव घेत मगरीस चिमट्याच्या सहाय्यानेपकडले. त्यानंतर सकाळी ११ वाजता मुखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मगरीवर डॉ. धनराज मुर्कीकरयांनी प्राथमिक उपचार केले. सध्या ही मगर वनक्षेत्रपाल अधिकारी कार्यालयात ठेवण्यात आली आहे.
या कामास नांदेडचे उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व कॅम्पा) भिमसिंग राठोड, मुखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर हराळ, निखील हिवरे यांनी मार्गदर्शन केले तर वनसंरक्षक धम्मपालसोनकांबळे, लक्ष्मण पांडुरणे, शेख महेबुब, प्रभु राठोड नदान शेख व ब्रम्हा राठोड यांनीही परिश्रम केले



