धक्कादायक… हॉस्टेलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

◽️नांदेड अंबेकर नगरातील नरंगले बॉईज हॉस्टेल मधील घटना
नांदेड प्रतिनिधी:- २० ऑगस्ट २५
शहरातील अंबेकर नगरातील नरंगले बॉईज हॉस्टेल मध्ये एका दहावीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊनआत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. शहरातील अन्य एका हॉस्टेल मध्ये काही दिवसापूर्वीच एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना विस्मरणात जात असतानाच नरंगले बॉईज हॉस्टेल मध्ये आत्महत्येची ही घटना घडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण नेमका कशाचा आहे याचा आता तपास पोलिसासह समाजव्यवस्थेलाही करावा लागणार आहे.
हदगाव तालुक्यातील चिकाळा येथील गंगाधर बजरंग माने (वय १५) हा दहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थीशहरातील अंबेकर नगरातील नरंगले बॉईज हॉस्टेलमध्ये गेल्या काही दिवसापासून राहत होता. २०ऑगस्ट रोजी त्याने सायंकाळच्या सुमारास होस्टेलमध्ये आपल्या रूममध्ये केबलने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही अस्पष्टच आहे. त्याचे रूम पार्टनर हे बाहेर होते. बाहेरून आल्यानंतर गंगाधर माने याने गळफास घेतल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनीतातडीने हॉटेल व्यवस्थापकाला सदर घटना सांगितली. हॉस्टेल व्यवस्थापकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना कळवली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावले. विमानतळ ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जोंधळे, पोलीस उपनिरीक्षक साखरे, साने आणि एएसआय सदाशिव आढाव यांनी घटनास्थळाला भेट दिली. पंचनामा करून मृतदेह खाली उतरविण्यात आला. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती



