Uncategorized

मुखेड येथे कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

मुखेड प्रतिनिधी:- २३ ऑगस्ट २५

मुखेड येथील शाहू नगर येथे वास्तव्यात राहणारा  देगलूर तालुक्यातील शहापूर येथील रहिवाशी शंकर माणिक मोते अंदाजे वय ४६ लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे 

शनिवार दि २३ ऑगस्ट रोजी फुलेनगर येथील कत्तलखानाच्या बाजूस अंदाजे ३ वाजताच्या सुमारास एका शेताच्या बाजूस असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे 

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही घटना स्थळावर जमाव उपस्थित होता त्यावेळी पोलिसांनी घटना स्थळी येऊन गळफास घेतलेल्या मृत शव झाडाखाली उतरवुन उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button