Uncategorized

मुखेडच्या मुस्लिम समाजाने जुलूस पुढे ढकलून सामाजिक सौहार्दाचा आदर्श ठेवत; सामाजिक सलोख्याचा संदेश दिला 

मुखेड प्रतिनिधी:- ०४ सप्टेंबर 

मुखेड शहरात गणेश विसर्जनादरम्यान हजारो भाविक एकत्र येतातत्यामुळे वाहतूक आणि सुरक्षेचे मोठेआव्हान पोलिसां पुढे असतेअशा परिस्थितीत मुस्लिम समाजाच्या या निर्णयामुळे पोलिस प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे

मुखेड शहरातील मुस्लिम समाजाने सामाजिक सलोखा आणि आंतरधर्मीय सौहार्द जपण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहेयंदा ५ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश विसर्जन आणि ईदमिलादुन्नबी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्यानंमुस्लिम समाजानं आपला पारंपरिक जुलूस ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबर २०२५ सोमवार रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहेया निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

मुखेड शहरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका ५ आणि ६ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडतातयाचवेळी ईद– मिलादचा जुलूसही निघालातर वाहतूक कोंडीगर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांवर प्रचंड ताण येऊ शकतोया परिस्थितीत कोणत्याही सणाला गालबोट लागू नये आणि दोन्ही समुदायांचे उत्सव शांततेत साजरे व्हावेतयासाठी मुस्लिम समाजाने हा संवेदनशील निर्णय घेतला आहे

मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधी हाफिज अब्दुल गफार यांनी सांगितले, “गणेश भक्त आणि जुलूसातील मुस्लिम बांधवांमध्ये कोणताही तणाव निर्माण होऊ नयेयासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहेगणेशविसर्जन शांततेत पार पडल्यानंतरच आम्ही आमचा जुलूस काढू.” असे गरीब नवाज मस्जिदचे हाफिज अब्दुल गफार म्हणाले.

मुस्लिम समाजाकडून आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहेमुस्लिम समाजाने केवळजुलूस पुढे ढकलण्याचा निर्णयच घेतला नाहीतर ईदमिलादच्या जुलूसात डीजे आणि प्रचंड आवाजाच्या साऊंड सिस्टीमच्या वापराला ठाम विरोध दर्शविला आहे.

मुस्लिम समाजाने पोलिसांशी चर्चा करून आणि परस्परांचा आदर राखून हा निर्णय घेतला आहेयापूर्वीहीगेल्या वर्षी अशीच परिस्थिती उद्भवलीतेव्हा मुस्लिम समाजाने जुलूस पुढे ढकलून सामाजिक सौहार्दाचा आदर्श ठेवला होता.

मुखेड पोलिस ठाणेचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी मुखेडच्या मुस्लिम समाजाने घेतलेल्या निर्णयचा स्वागत केले आहे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button