जगदगुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्र माऊली यांच्या वाढदिवसा निमित्त “एक पेड माँ के नाम” उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

मुखेड प्रतिनिधी:- २१ सप्टेंबर
जगदगुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्र माऊली यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर “एक पेड माँ केनाम” हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुखेड तालुक्यात पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

हा उपक्रम जिल्हा सेवा समिती दक्षिण नांदेड व तालुका सेवा समिती मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्र माऊली यांचा वाढदिवस २१ ऑक्टोबर रोजी असून “जगदगुरूंच्या संकल्पनेतून व पर्यावरण रक्षणाच्या प्रेमातून एक पेड माँ के नाम हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे असे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर, नंदकुमार मडगुलवार, दिलीप कोडगिरे, भाजप शहराध्यक्ष नागनाथ लोखंडे, किशोर चव्हाण, बाळू नाईक, सुधीर चव्हाण, संदीप केंद्रे, शिवाजी राठोड ,जिल्हा अध्यक्ष श्यामभाऊ नागलगावे, प्रसिद्धी प्रमुख अशोक चारकुलवार, तालुका अध्यक्ष मारोती इबितवार, तालुका सचिव माधव मोरे, तालुका संजीवनी प्रमुख अमर स्वामी, जिल्हा संजीवनी प्रमुख शंकर पाटील नखाते, जिल्हा धर्म क्षेत्र प्रमुख महेश इंगळे, तालुका सामाजिक उपक्रम प्रमुख वेंकट मारकवाड, तालुका प्रसिद्धी प्रमुख हणमंत पाटील, कोळी गल्ली सेवाकेंद्र अध्यक्ष मारोती मुदेवाड, दत्त मंदिर सेवा केंद्र अध्यक्ष गणेश कळसकर, तालुका कॅप्टन नामदेव पांडलवार, ब्लॅक कमांडो तुकाराम दोमाटे, शंकर गदपवाड, लक्ष्मण पाटील जाधव, विठ्ठल बोडके तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून समाजात पर्यावरण संवर्धना बाबत जागृती निर्माण होऊन प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश या वृक्षारोपण कार्यक्रमातून देण्यात आला.



