क्राईम

देगलूरात नऊ लाखांचा गुटखा जप्त; हिंगोलीतील दोघांवर गुन्हा दाखल

देगलूर प्रतिनिधी:- १ जुलै २५

तालुक्यातील वझरगा येथे सोमवारदिनांक ३० जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास देगलूर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा  तंबाखूजन्य पदार्थांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन जणांवर कारवाई करत एकूण नऊ लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाही कारवाई पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर तात्काळ कृती करत केली.

या कारवाईत शेख साजीद शेख जलाल बागवान (वय ३८ शेख अख्तर शेख गफार बागवान (दोघेही रासदर बाजारजामा मस्जिद जवळहिंगोलीया दोन आरोपींना अटक करण्यात आलीहे दोघे पांढऱ्यारंगाच्या स्विफ्ट डिझायर (ΜΗ १२ KN ६०३९) कारमधून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती देगलूर पोलिसांना मिळाली होतीत्यानुसार पोलिसांनी वझरगा येथे सापळा रचून संबंधित कार अडवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित माल आढळून आला.

विमल केशरयुक्त पान मसाला १५ पोते २१,४१,००० व्ही. बीग टोबॅको – २० पुडे २९,००० रजनीगंधापान मसाला ₹३६,००० सिग्नेचर पान मसाला – २२४ पुडे – २१,३४,००० वाहतूक करणारी कार (स्विफ्टडिझायरपांढऱ्या रंगाची) – अंदाजे २६,००,००० एकूण जप्त मुद्देमालाची किंमत २९,२०,४०० एवढी आहेया प्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील कृष्णा तलवारेसाहेबराव सगरोळीकरवैजनाथ मोटारगेराजवंत सिंघ बुंगई  रंजीत मुदिराज यांनी संयुक्तपणे केली.

पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करीला मोठा आळा बसला असूननागरिकांतून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button