आज बडी दर्गाह उर्स; कंधार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

कंधार प्रतिनिधी:- ०६ जानेवारी २६
हिंदू–मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले प्रसिद्ध सुफीसंत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम सय्यद सईदीद्दीन रफाई (रहे.) यांच्या ७११ व्या उर्साला आज मंगळवारी, दि.६ जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या उर्सामध्ये संदल मिरवणूक, कुस्त्यांची दंगल, कव्वालीचा मुकाबला, हास्यकवी संमेलनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
आज मंगळवारी, दि.६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता नमाज नंतर बडी दर्यातून संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. बुधवारी, ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे. संध्याकाळी ८ वाजता टी.व्ही. सिंगर बेबीजारा वारसी (दिल्ली)) व टी.व्ही. सिंगर साखीब आली साबरी (उत्तरप्रदेश) यांचा कव्वालीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच मंगळवारी, दि. ६ जानेवारी व बुधवारी, दि.७ जानेवारी रोजी
लंगरचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी, दि.८ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजता कुलहिंद मजाहीया मुशायरा (हास्यकवी संमेलन) आयोजित करण्यात आला आहे. या कवी संमेलनात नामांकित कवी
उर्सानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बडी दर्याचे सज्जादा नशीन सय्यद शहा मुर्तुजा मोहियोद्दीन हुसेनी रफाई, बडी दर्गाचे मुतवल्ली सय्यद शहा मुजतबा मोहियोद्दीन हुसेनी रफाई, बडी दर्गा उर्स कमिटीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मोहम्मद जफरोदिन बाहोदिन यांनी केले आहे.



