मुखेड शहरात व्यसनाच्या विळख्यात अडकले कमी वयातील मुलं.

▫️शहरालगत असलेले ले आऊट बनले अय्याशीचे अड्डे
▫️१३ वर्षांखालील मुलांमध्ये गांजा व तंबाखूचे वाढते व्यसन
मुखेड प्रतिनिधी:- २९ जानेवारी २६
मुखेड शहरात अल्पवयीन मुलं व्यसनाच्या अधीन असल्याचे एक चिंताजनक परिस्थिती समोर आली आहे. शहरातील विविध शाळा आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांमध्ये ड्रग्स, गांजा आणि अन्यव्यसनांचा वापर वाढत असल्याचे समोर आले आहे. सरासरी किराणा दुकानावर गुटखा, मावा, तंबाखूयासारखे व्यसनाचे पदार्थ सहज उपलब्ध असल्याने अल्पवयीन मुलं व्यसनाचे अधीन होत आहेत.
शहरात गुटखा, गांजा सारखे अमली पदार्थ चौका चौकात सहज मिळत असल्याने तरुणाई व अल्पवयीन मुलं मुली व्यसनाचे अधीन होत आहे. लपून छपून नशा करणाऱ्यांसाठी शहरालगत असलेले ले आऊट अय्याशीचे अड्डे बनले आहे. अंधार पडताच शहरातील कौठा रोड,जुनी नगरपालिका, नवीन नगरपालिकेच्या पाठीमागे नवीन रोड परिसर , चंद्रमा धाबेच्या बाजूस सैलानी दर्गा परिसर,लातूर रोड ईदगाह परिसर ,क्रीडा संकुलन परिसर ,फिल्टर पाण्याची टाकी परिसर,हुतात्मा शाळा परिसर या मार्गावर मुलं दुचाकीवर जाताना दिसून येतात. विशेष म्हणजे गांजा, गुटखा, तंबाखू, खर्रा सारख्यामादक पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध असून शहरात खुलेआम याची विक्री होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस प्रशासन या विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई करीत नाही.
पोलिसांचा निष्काळजीपणा देखील या परिस्थितीला कारणीभूत ठरत असल्याचे आरोप होत आहेत. पोलिसांनी वेळेवर कार्रवाई न केल्यामुळे व्यसनाचे कारोबार वाढत असल्याचे म्हटले जात आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. त्यांनी मुलांनाव्यसनाच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करण्याचे प्रयत्न सुरू केले पाहिजे .
शहरातील नागरिकांनी पोलिसांच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी वेळेवर कार्रवाई करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे
▫️प्रशासनाने काय उपाययोजना करावी?
▫️ सरासरी किराणा दुकानावर व्यसनाचे पदार्थ विक्री करण्यावर पाबंदी घालावी.
▫️ पोलिसांनी वेळेवर कार्रवाई करून व्यसनाचे कारोबार थाळवावा.
▫️अल्पवयीन मुलांना व्यसनाच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करावे.
▫️ व्यसनमुक्ती केंद्रांची स्थापना करावी.
▫️ गांजा आणि अन्य अमली पदार्थांच्या तस्करीवर कडक कार्रवाई करावी.
▫️ विनाकारण रात्री १० च्या नंतर घरा बाहेर फिरण्यास पाबंदी घालावी.
▫️रात्री १० ते १२ वाजे पर्यंत चौकात व गली बोळ्यात मोबाईलवर गेम खेळत बसणाऱ्या मुलांनवर पाबंदी घालावी.



