आए.डि.ए. नांदेड शाखेच्या वतीने मेगा रक्तदान शिबिर: २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले

नांदेड | प्रतिनिधी ३० जानेवारी
इंडियन डेंटल असोसिएशन,नांदेड शाखेच्या वतीने दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी श्री.गुरुगोविंदसिंगजी ब्लड बँक, नांदेड येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
“रक्तदान करा – जीवनदान करा” या संदेशासह पार पडलेल्या या शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात २५ हून अधिक डॉक्टरांनी सक्रिय सहभाग नोंदवला असून २५ पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदात्यांमध्ये आज.डि.ए नांदेड शाखेचे सदस्य डॉ.संदीप दंडे,डॉ.मोतिलाल जांगिड, डॉ.सुशिल येमले, डॉ. अनिल देवसरकर, तसेच स्थानिक वैद्यकीय संघटनांतील डॉक्टर तसेच नांदेड जिल्हा व तालुक्यातील नागरिकांचा समावेश होता.
रक्तदानाची संपूर्ण प्रक्रिया सर्व आवश्यक सुरक्षितता व दक्षतेच्या उपाययोजना पाळून पार पाडण्यात आली. रक्तदात्यांसाठी अल्पोपहार, चहा व कॉफीची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तसेच IDA नांदेड शाखेतर्फे सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व पाण्याची बाटली देऊन सन्मान करण्यात आला.

IDA नांदेड शाखेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व ज्येष्ठ सदस्यांनी समाधान व्यक्त केले असून, सर्व सहभागी सदस्यांनी दाखविलेला स्वयंप्रेरित सहभाग अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमाची स्थानिक वृत्त माध्यमांनीही दखल घेतली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आज.डि.ए.चे
अध्यक्ष डॉ. अनुपमा नळदकर,मानद सचिव डॉ. राहुल कदम,खजिनदार डॉ. पांडुरंग श्रीरामे सि.डि.एच संयोजक-
डॉ. प्रियांका घोंसिकर, डॉ. मृणाल देशमुख ,डॉ. सोनाली दंडे ,
डॉ. विशाल फोले ,डॉ. स्नेहा भोपाळे यांनी प्रयत्न केले



