नांदेडमध्ये खळबळ: राष्ट्रवादीच्या नेत्याच्या त्रासाला कंटाळून भावी डॉक्टरची आत्महत्या;गुन्हा दाखल !

नांदेड प्रतिनिधी:- ०८ मार्च २६
नांदेड शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका २५ वर्षीय विद्यार्थिनीने वसतीगृहात गळफास घेऊनआत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी हडको परिसरात ही घटना घडली. आकांक्षा मुंजाजी गायकवाड असंया तरुणीचं नाव आहे. “वसतीगृहाची फीस थकल्याने वसतीगृहचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचिटणीस जीवन घोगरे हे मानसिक त्रास देत होते, या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली,” असाआरोप पीडित कुटुंबीयाने केला. त्यानुसार शुक्रवारी रात्री ग्रामीण पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकचखळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा गायकवाड ही हडको येथील शामराव कदम होमिओपॅथिकम हाविद्यालयातील द्वितीय वर्षाचं शिक्षण घेत होती. आई वडील वीट भट्टीवर मजुरीचे काम करतात. महाविद्यालयाच्या काही अंतरावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे प्रदेश चिटणीस जीवन घोगरेपाटील यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या इमारतीत त्यांनी कॉट बेसिसवर सुरू केलेले वसतीगृह आहे. मागील दोन वर्षांपासून आकांक्षा ही कॉट बेसिसवर राहत होती. शुक्रवारी दुपारी ती वस्तीगृहाच्या खोलीतपंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीसठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
दुसरीकडे मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी वसतीगृहचालक तथा राष्ट्रवादीच्या नेत्यावर गंभीर आरोप केले. आठ महिन्यापासून फीस थकल्याने जीवन घोगरे यांच्याकडून आकांक्षाला मानसिक त्रास सुरु होता, त्यामुळे या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.
दरम्यान, या वसतीगृहात ४० हून अधिक मुली कॉट बेसेसवर राहतात. महिन्याला प्रत्येकी अडीच हजाररुपये वसतीगृह चालकाकडून घेतले जायचे. या वसतीगृहाला परवानगी नसल्याचे बोलले जात आहे. दजीवन घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठाणमांडले होते. त्यानंतर पोलिसांकडून घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.



