ZP शाळेत धक्कादायक प्रकार: नराधम शिक्षकाकडून ५ चिमुरडींवर लैंगिक अत्याचार

मुखेड प्रतिनिधी:- १० मार्च २६
भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात विद्येचे मंदिर मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. ज्या शिक्षकावर मुलांच्या भविष्याची जबाबदारी असते, त्याच शिक्षकाने पाच अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पवनी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने आपल्याच शाळेतील पाच लहान मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे. एका पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.
अनिल राऊत असं अटक केलेल्या नराधम शिक्षकाचं नाव आहे. तो मागील पाच वर्षांपासून पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने याच शाळेतीलपाच निष्पाप मुलींसोबत अश्लील आणि लैंगिक कृत्य केलं. इतकेच नाही, तर या कृत्याबाबत कुणालाकाहीही सांगितल्यास ‘जीवे मारण्याची धमकी‘ देऊन त्याने मुलींना घाबरवलं होत
आरोपीच्या या कृत्यामुळे मुली प्रचंड दहशतीखाली होत्या. मात्र, अत्याचार सहन न झाल्याने अखेर एका पीडित मुलीने आपल्या पालकांकडे धाडसाने सर्व हकीकत सांगितली. आपल्या मुलीसोबत घडलेला हाप्रकार ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. याबाबत अधिक चौकशी केली असता नराधमाने अशाप्रकारे शाळेतील इतर मुलींचं देखील शोषण केल्याचं समोरआलं. या सगळ्या प्रकारानंतर संतप्त झालेल्या पालकांनी थेट शाळा गाठून आरोपी शिक्षक अनिल राऊतयाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर तात्काळ पवनी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने शाळेत धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी पीडित मुलींच्या पालकांच्या तक्रारीवरून आरोपी अनिल राऊत याच्यावर बाल लैंगिकअत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो – POCSO) आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. त्याने आणखी काही मुलींना अशा प्रकारे लक्ष्य केलं आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.



