शैक्षणिक

हायकोर्टाचा मोठा दिलासा! आरटीई प्रवेशाला मुदतवाढ, जुन्याच नियमांनुसार प्रक्रिया

मुखेड प्रतिनिधी:- १० मार्च २६

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत अर्थात आरटीई द्वारे शाळा प्रवेशासाठी  किमीच्या अटीला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं स्थगिती दिली असून पूर्वीच्या नियमांप्रमाणेच प्रवेश देण्याचे आदेश सरकारला दिले आहेतआज आरटीई अंतर्गत अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती ती देखील पुढे ढकलण्यात आली आहेत्यामुळं लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

आरटीई अंतर्गत शाळा प्रवेशांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख होतीसरकारनं यंदा या कायद्यात नवी नियमावली लागू करत पूर्वीच्या  किमी ऐवजी  किमीच्या परिसरातीलच शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल असे आदेश काढले होतेयाविरोधात पालकांनी तीव्र विरोध केलात्याअनुषंगानं नागपूरच्या खंडपीठात याविरोधात याचिका देखील झाल्याया याचिकांवर एकत्रित सुनावणी घेत काल खंडपीठानं या  किमीच्या अटीला स्थगिती दिली.

दरम्यानआजच्या सुनावणीत खंडपीठानं आजची प्रवेशाची शेवटची तारीखही पुढे ढकललीतसंचआरटीईच्या ऑनलाईन पोर्टलवर  किमीचा नियम काढून पूर्वीप्रमाणे  किमीचा नियम अपडेट करण्यासाठी १२ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहेपोर्टलवर हे अपडेशन झाल्यानंतरच आरटीई अंतर्गत ऑनलाईन नोंदणीच्या प्रवेश प्रक्रियेचा कालावधी सरकारने जाहीर करावाअसे आदेश नागपूरखंडपीठानं दिले आहेतयामुळं  किमीच्या अटीमुळे ज्या विद्यार्थ्यांना शाळा उपलब्ध नसल्यानं नोंदणी होऊ शकली नाही अशा लाखो विद्यार्थ्यांना यामुळं दिलासा मिळाला आहे.

आरटीई अंतर्गत एक किलोमीटरच्या अटी विरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात अॅडदीपकचटपअॅडबोधी रामटेके यांच्यासह आशिष फुलझेले आणि अनिकेत कुत्तरमरे यांनी दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्याया याचिकांवर सुनावणी करताना खंडपीठानं राज्य शासनाला आरटीईप्रवेश प्रक्रियेच्या अटीत सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button