राजकीय

हिमायतनगरची सुरक्षा रामभरोसे? सीसीटीव्ही बसवण्यासाठी नगरपंचायत व पोलिसांना साकडे

हिमायतनगर श्रमिक एकता न्यूज़  (प्रतिनिधी): अजीम हिंदुस्तानी

हिमायतनगर शहरातील कायदा  सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी शहरात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेतया मागणीसाठी ‘ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेना’ आक्रमक झाली आहेसंघटनेच्या वतीने आज पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासन या दोन्ही विभागांना स्वतंत्र निवेदने देऊन या शहरात गेल्या काही काळापासून चोरीखून आणि प्राणघातक हल्ल्यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहेया पार्श्वभूमीवर मराठवाडा अध्यक्ष शेख खय्युम शेख महेबुब कुरेशी यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे कीसीसीटीव्ही यंत्रणा बसवणे ही काळाची गरज आहे.

शहराच्या सौंदर्यीकरणासोबतच नागरिकांची सुरक्षा ही नगरपंचायतीची जबाबदारी आहेत्यामुळे मूलभूत सुविधांतर्गत मुख्य चौकांमध्ये हायडेफिनिशन कॅमेरे बसवण्यासाठी नगरपंचायतीने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा.

गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्यावर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणे आवश्यक आहे.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ (जगण्याचा अधिकारआणि अनुच्छेद ४७ (सार्वजनिक सुरक्षाचा दाखला देतनागरिकांना भयमुक्त वातावरण देणे हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे निवेदनात म्हटले आहेविशेषतः उमर चौक, आंबेडकर चौक, बस स्थानक, चौपाटी आणि मुख्य बाजारपेठ यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे नसल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी पोलिस निरीक्षक अमोल भगत ,मुख्याधिकारी ताडेवाड, नगर अध्यक्ष रफीक सेठ, उपनगरध्यक्ष विनोद गुंड्डेवार, नगरसेवक जिशान मिर्जा , नगरसेवक गजानान चायल आदि संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होतेआता या निवेदना नंतर नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन नेमकी काय पावले उचलतेयाकडे हिमायतनगरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button