क्राईम

नांदेड हादरले! गँगवारमधून तिघांची निघृण हत्या; शासकीय रुग्णालयात घुसून हल्लेखोरांचा थरार

नांदेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०४ एप्रिल २०२६

नांदेड शहरात आज गँगवारने पुन्हा एकदा डोके वर काढले असूनशनिवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांत तिघांची निघृण हत्या करण्यात आलीशहरातील स्क्वेअर परिसरात एकाची धारदार शस्त्राने वार करूनतर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दोघांची चाकूने वार करूनहत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहेया घटनेमुळे नांदेडच्या कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसारशहरातील कॅनाल रोडवरील स्क्वेअर परिसरात वर्चस्वाच्या वादातून सय्यदआवेजसय्यद खलीलघनश्याम रेड्डीमोहंमद अरबाज आणि इतर अज्ञात हल्लेखोरांनी अरिजितसिंग गजानन चव्हाण (वय २५) याच्यावर जीवघेणा हल्ला केलाया हल्ल्यात अरिजितसिंग जागीच ठारझालाया संघर्षात सय्यद आवेज आणि मोहंमद अरबाज हे दोघेही जखमी झाले होतेज्यांना पोलिसांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

अरिजितसिंगच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ चाकूघेऊन थेट शासकीय रुग्णालयात पोहोचलादवाखान्यातील अपघात विभागाजवळ उपचार सुरूअसलेल्या सय्यद आवेज सय्यद खलील (वय २७) आणि मोहंमद अरबाज मोहंमद फारुख (वय २३)यांच्यावर त्याने सपासप वार केलेरुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी झालेल्या या हल्ल्यात हेदोघेही जागीच गतप्राण झालेरुग्णालयात उपस्थित रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये या थरारामुळे मोठीपळापळ झाली.

नांदेड शहरात कठोर कारवाईसाठी ओळखले जाणारे ‘सिंघम‘ अधिकारी कार्यरत असतानाहीभररस्त्यात आणि रुग्णालयात अशा प्रकारे तिहेरी हत्या घडल्याने पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठत आहेहल्लेखोरांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झालेसंपूर्ण शहरात नाकेबंदी करण्यात आली असून फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे संकलित केले जात आहेतसीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेतजुना वादकिंवा टोळीयुद्धातून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button