सामाजिक

न्यायासाठी ८० वर्षीय मरुबाई कांबळे यांचे ‘आमरण उपोषण’! प्रशासकीय आश्वासनानंतरही मरुबाईंच्या जागेचा प्रश्न कायम

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ०३ एप्रिल २६

तालुक्यातील खरब खंडगाव येथील मरुबाई सखाराम कांबळे (वय ८० वर्षेया वयोवृद्ध दलित महिलेच्या हक्काच्या जागेचा ताबा मिळवून देण्यात महसूल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे१३ जानेवारी२०२६ रोजी तहसीलदारांनी लेखी पत्र देऊनही अतिक्रमण धारकांवर कोणतीही कारवाई  झाल्यानेसंतापलेल्या मरुबाई कांबळे यांनी आता ‘आमरण उपोषण’ पुकारले आहे.

यापूर्वी १२ जानेवारी रोजी मरुबाई कांबळे उपोषणास बसल्या होत्यात्यावेळी प्रशासनाने १३जानेवारीला लेखी पत्र देऊन बेकायदेशीर बांधकाम बंद करण्याचे आदेश दिले होते आणि “आम्ही तातडीने कारवाई करत आहोत” असे आश्वासन दिले होतेप्रशासनाच्या या शब्दावर विश्वास ठेवून ८० वर्षांच्या माउलीने उपोषण मागे घेतले होतेमात्रदोन महिने उलटूनही जागेचा ताबा मिळाला नाहीचउलट अतिक्रमण धारकांनी प्रशासनाला  जुमानता पुन्हा बांधकाम सुरू केल्याने प्रशासनाची नाचक्की झाली आहे.

मयत पतीच्या नावे असलेली ही जागा हडपण्यासाठी गावातील काही लोकांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाहाताशी धरून हे कारस्थान रचल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहेजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे हे प्रकरण प्रलंबित असतानाहीअनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांना प्रशासनातील कोणाचे अभय आहेअसा जळजळीत सवाल आता विचारला जात आहे

वयोवृद्ध मरुबाई कांबळे आणि त्यांच्या सूनबाई लक्ष्मीबाई कांबळे यांनी ३० मार्च २०२६ पासून पुन्हा एकदा मुखेड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेयावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे कीकेवळकागदी घोडे नाचवून आमची फसवणूक करू नकाजोपर्यंत जागेचा प्रत्यक्ष ताबा मिळत नाही आणि अतिक्रमण धारकांवर गुन्हे दाखल होत नाहीततोपर्यंत अन्न-पाण्याचा त्याग करून हे आमरण उपोषण सुरूच राहील.

एका ८० वर्षांच्या वृद्धेला न्यायासाठी जिवाचं बलिदान देण्याची वेळ येणेहे लोकशाहीसाठी लज्जास्पद आहेआता जिल्हा प्रशासन या आजींना न्याय देतं की अघटित घडण्याची वाट पाहतंयाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button