मालमत्तेच्या वादातून चुलतीनेच केला ६ वर्षीय पुतण्याचा खून; लातूर पोलिसांकडून १७ तासांत गुन्ह्याचाउलगडा

मुखेड प्रतिनिधी : श्रमिक एकता न्यूज़ २१ एप्रिल २६
कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून एका महिलेने आपल्या सहा वर्षांच्या पुतण्याचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे उघडकीस आली आहे. अवघ्या १७ तासांच्या आतचाकूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावत आरोपी चुलतीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

स्वामी कुटुंबातील दोन अल्पवयीन चुलते बेपत्ता झाले होते. पोलीस तपासात सहा वर्षीय मुलाचा मृतदेह आदळून आला होता. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करत या गुन्ह्याचा १७ तासांच्या आत पर्दाफाश केला.
हत्या झालेल्या मुलाचे नाव देवांश स्वामी असे आहे. तर हत्या करणाऱ्या महिलेचे नाव अनिता दिनेश स्वामी असे आहे. रविवारी उजळंब रोडवरील एका पडक्या घराजवळ देवांशचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. तेव्हा हत्या गळा दाबून करण्यात आल्याचे समोर आले. हत्या केल्यानंतर मृतदेह लपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले. एवढेच नाही तर स्वतःचा मुलगा बेपत्ता असल्याचा बनाव देखील आरोपीने महिलेनेरचला होता. जेणेकरून पोलिसांना त्यांच्यावर संशय येऊ नये. मात्र पोलिसांनी शोध मोहीम राबवतत्याला मुलाला सुखरूप शोधून काढले आणि त्याच धाग्यावरून संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला.
चुलतीनेच हत्या केल्याचे सामोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. स्वामी कुटुंबात मागील काही वर्षांपासून मालमत्तेच्या वाटणीवरून वाद सुरु होता. हा वाद पंचाच्या उपस्थित मिटविण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र या वादातून निर्माण झालेल्या रागाच्या भरात अनिता दिनेश स्वामी (वय ३४) हिने आपल्या पुतण्याचा खून केल्याचा समोर आले आहे.
या प्रकरणी मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे चाकूर पोलिसांनीया प्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.



