आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये शिवसेना ॲक्शन मोडवर; पक्ष संघटना बळकटीकरणासाठी शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!

▫️मुखेड-कंधार मतदारसंघाच्या मतदार यादी पुनर्रचना प्रक्रियेचा सविस्तर आढावा; बूथ स्तरापर्यंत समन्वय मजबूत करण्यावर भर
नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २० मे २६
आगामी निवडणुका आणि मतदार यादी पुनर्रचना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात शिवसेना पक्षसंघटना अधिक गतिमान आणि बळकट करण्यासाठी सर्व आजी–माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारीआणि शिवसैनिकांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक ‘शिवसेना जनसंपर्क कार्यालय, नांदेड‘ येथे संपन्न झाली.
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे, शिवसेना संसदीय गटनेते खासदार मा.डॉ. श्रीकांत शिंदे तसेच शिवसेना उपनेते व विधान परिषदेचे आमदार मा. हेमंत पाटील यांच्या आदेशानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला शिवसेना सचिव (SIR निरीक्षक) मा. सुधाकरजी तांबोळी आणि नांदेड दक्षिणचे आमदार मा. आनंदरावजी बोंढारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत प्रामुख्याने मुखेड–कंधार मतदार संघातील आगामी मतदार यादी पुनर्रचना प्रक्रियेच्या अनुषंगाने विविध विषयांवर सविस्तर आणि सखोल चर्चा करण्यात आली.
लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आता पासूनच सक्रियपणे काम करावे, असे आवाहन वरिष्ठ नेत्यांनी यावेळी केले. याबैठकीत विशेषतः खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला:
१) नियुक्ती: प्रत्येक मतदान केंद्रावर सक्षम एजंटची नियुक्ती करणे. २) मतदार पडताळणी व नोंदणी: मतदार यादीतील त्रुटी दूर करून नवमतदार नोंदणी मोहीम प्रभावीपणेराबवणे.३) बूथ समन्वय: बूथ स्तरापर्यंत पक्षाचा समन्वय मजबूत करत आगामी काळातील राजकीय नियोजन तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे.
या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, उपजिल्हाप्रमुख व्यंकटराव पाटीलखतगावकर, वनमालाताई राठोड, प्र.डॉ. अतुल सावकार देबडवार, तालुकाप्रमुख बालाजी पाटील कबनुरकर, गोपाळ पाटील राजुरकर, मारोती पाटील अमनर, गटनेते विनोद अडेपवार आणि शहरप्रमुख बजरंग कल्याणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच नगरसेवक पंकज गायकवाड, नगरसेवक शंकर चिंतमवाड, नगरसेवक जयप्रकाश कानगुले, गजानन साखरे, बालाजी बाबळे, गोविंद वाडेकर, सय्यद दिलावर साब, शिवाजी हेडगुले यांच्यासह शिवसेना व युवासेना मुखेडचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला शिवसैनिक, युवा सैनिक आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीमुळे नांदेड जिल्ह्यातील, विशेषतः मुखेड–कंधार मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये एक नवाउत्साह संचारला असून पक्षाने आगामी काळासाठी तळागाळात मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र स्पष्टदिसत आहे.



