मुखेड पंचायत समितीत ‘एसीबी’चा मोठा दणका! सिंचन विहिरीच्या हप्त्यासाठी २५ हजारांची लाच मागणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यासह सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल!!

▫️डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेत भ्रष्टाचार; प्रत्यक्ष लाच स्वीकारली नसली तरी ‘एसीबी’च्या पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध!
मुखेड प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज़ २२ मे २६
मुखेड पंचायत समिती मधील भ्रष्टाचाराचा काळा चेहरा समोर आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजने अंतर्गत मंजूर झालेल्या सिंचन विहिरीचा दुसरा हप्ता बँकेत जमा करण्याच्या बदल्यात २५ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी मुखेड पंचायत समिती मधील कृषी विस्तार अधिकारी आणिएका सेवानिवृत्त विस्तार अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपीं विरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, भ्रष्ट अधिकाऱ्याच्या घराची झडती घेण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. आरोपींची नावे: १. अमोल राठोड (विस्तार अधिकारी – कृषी, गट क, पंचायत समिती मुखेड). २. गणपतराव शिंदे (खाजगीइसम तथा सेवानिवृत्त विस्तार अधिकारी – कृषी, रा. मुखेड).
नेमके प्रकरण काय तक्रारदार यांच्या मोठ्या भावाच्या नावे मौजे कुंद्राळा येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन/विशेषघटक योजना‘ अंतर्गत सिंचन विहीर मंजूर झाली होती. विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर, सिमेंटचे कडेटाकण्यासाठी २,०५,००० रुपयांचा दुसरा हप्ता मंजूर करून तो बँकेत जमा करायचा होता. मात्र, हक्काचा निधी खात्यावर टाकण्यासाठी विस्तार अधिकारी अमोल राठोड आणि सेवानिवृत्त अधिकारीगणपतराव शिंदे यांनी तक्रारदाराकडे २५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली
तक्रारदाराने या प्रकरणी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली. २६फेब्रुवारी २०२६ रोजी ‘एसीबी‘ने केलेल्या पडताळणीत, अमोल राठोड याने सेवानिवृत्त अधिकारी शिंदेयाच्यामार्फत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. चर्चेदरम्यान, सुरुवातीला २०,००० रुपये आणि काम पूर्णझाल्यावर ५,००० रुपये देण्याचे ठरले होते.
यानंतर लाचलुचपत विभागाने २७ फेब्रुवारी, ४ मार्च आणि अगदी कालच म्हणजे २० मे २०२६ रोजीआरोपींना रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी शिंदे याला तक्रारदाराचा संशय आल्याने त्याने ऐनवेळी लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळेआरोपींना प्रत्यक्ष रक्कम घेताना पकडता आले नाही.
जरी प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारली गेली नसली, तरी कायदेशीर पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे १००% सिद्ध झाले आहे. त्यामुळे दोन्ही आरोपीं विरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ आणि ७अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तातडीनेसुरू करण्यात आली आहे. तसेच, आरोपी लोकसेवकाच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया देखीलएसीबीकडून सुरू आहे.
ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेडचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत पवार यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश बनसोंडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचापुढील धडाकेबाज तपास पोलीस निरीक्षक अर्चना करपुडे करत आहेत.
‘श्रमिक एकता न्यूज’चे आवाहन: शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा कोणत्याही कामासाठीजर कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी लाचेची मागणी करत असेल, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी तात्काळ संपर्क साधावा, लाच देणे आणि घेणे हा दोन्ही कायदेशीर गुन्हे आहेत!



