सामाजिक

काम पोलिसांसारखं, मग दर्जा मजुरासारखा का? राज्यातील ४० हजार होमगार्ड्सच्या व्यथा!

मुखेड प्रतिनिधी (श्रमिक एकता न्यूज): २१ मे २६ 

सणउत्सव असोकायदासुव्यवस्थेचा प्रश्न असो की निवडणुकांचा काळपोलिसांच्या खांद्याला खांदालावून चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील ४० हजारांहून अधिक होमगार्ड (गृहरक्षक दलपोलिसांचे जगणे सध्या अत्यंत हलाखीचे बनले आहेवर्षातील केवळ  ते  महिनेच काम आणि त्यातही भत्त्याची अनिश्चिततायामुळे हे रक्षक आज स्वतःच्या हक्कांसाठीच प्रशासनाशी संघर्ष करत आहेतब्रिटीशकालीन विचारांवर आधारलेला ‘बॉम्बे होमगार्ड ॲक्ट, १९४७’ हा जुलमी कायदा तात्काळ बदलूनहोमगार्ड्सना ‘स्वयंसेवक‘ नव्हेतर ‘नियमित कर्मचाऱ्यांचा‘ दर्जा द्याअशी आक्रमक मागणी आता जोरधरू लागली आहे.

गेल्या अनेक दशकांपासून होमगार्ड्सचा वापर केवळ अतिरिक्त मनुष्यबळ म्हणून केला जात आहे१९४७ च्या कायद्याचा हवाला देत त्यांना आजही केवळ ‘स्वयंसेवक‘ मानले जातेयाच तांत्रिक मुद्द्याचा गैरफायदा घेऊन सरकार त्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतननिवृत्ती वेतन (पेन्शन), वैद्यकीय सुट्ट्याकिंवा हक्काच्या विमा योजनांच्या लाभांपासून वंचित ठेवत आहे. “काम पोलिसांसारखे आणि वागणूकमजुरासारखी” अशी भयानक परिस्थिती आज या जवानांची झाली आहे.

राज्यात ४० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड कार्यरत असतानात्यांना वर्षातून जेमतेम  ते  महिनेच ड्युटीदिली जातेउर्वरित  ते १० महिने या जवानांना बेरोजगार राहावे लागतेअत्यंत महागाईच्या या काळात केवळ काही दिवसांच्या मानधनावर होमगार्ड्सनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचाअसासंतप्त सवाल उपस्थित होत आहेत्यातही अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजेहक्काचा दैनंदिन भत्ता मिळवण्यासाठीही या जवानांना महिनोनमहिने वाट पाहावी लागते.

नियमित सेवा द्या: होमगार्ड्सना वर्षातील ३६५ दिवस नियमित काम देण्यात यावेजेणेकरूनत्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही.

कायद्यात बदल करा: ७९ वर्षे जुना आणि कालबाह्य झालेला ‘बॉम्बे होमगार्ड ॲक्ट‘ मोडीत काढूनया जवानांना हक्काचे शासकीय अधिकार आणि निवृत्ती वेतन मिळालेच पाहिजे.

आपल्या जीवाची पर्वा  करता ऊनवारापावसात जनतेच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या या खाकीवर्दीतील जवानांना न्याय देण्याची वेळ आता आली आहेसरकारने या ज्वलंत प्रश्नाकडे डोळेझाक करता तात्काळ निर्णय घ्यावाअन्यथा या अन्यायाविरुद्ध राज्यातील ४० हजार होमगार्ड्सचा असंतोष रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाहीअसा इशारा आता दिला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button