क्राईम

नांदेडमध्ये शोककळा: नाल्याच्या साचलेल्या पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १६ एप्रिल २६

 नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात एक अत्यंत भीषण आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहेशाळा सुटल्यानंतर घरी परतत असतानाहारूनबाग भागातील एका मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या चार चिमुरड्यांचा बुडून मृत्यू झालाया घटनेमुळे संपूर्ण इस्लामपुरा आणि देगलूर नाका परिसरात शोककळा पसरली असूनपरिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसारमृत पावलेली चारही मुले ही शहरातील इस्लामपुरा भागातील रहिवासी होतीशाळा सुटल्यानंतर ही मुले नेहमीप्रमाणे घराकडे जात होतीवाटेत हारूनबाग परिसरात एका मोठ्याखड्ड्यात पावसाचे किंवा नाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात साचलेले होतेपाण्याचा अंदाज  आल्याने हीमुले पोहण्याच्या मोहापायी पाण्यात उतरलीमात्रखड्ड्यातील पाण्याचा खोलीचा अंदाज  आल्याने एका पाठोपाठ एक अशी चारही मुले पाण्यात बुडाली.

या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या मुलांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

महोमद अली (वय १३ वर्षे),महोमद फुरखान (वय १२ वर्षे),महोमद अदनान (वय  वर्षे),महोमद रेहान(वय ११ वर्षे)

विशेष म्हणजेमृत मुलांपैकी महोमद फुरखान आणि महोमद अदनान हे दोन्ही सख्खे भाऊ होते. एकाचकुटुंबातील दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुले घरी  परतल्याने शोधाशोध सुरू झाली असताही मुले खड्ड्यातील पाण्यात असल्याचे निदर्शनास आलेत्यांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आलेमात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेयाघटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होतीउघड्यावरील खड्डे आणि साचलेले पाणी निष्पापजीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

एकाच वेळी चार मुलांचा असा अंत झाल्याने नांदेड शहरावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button