Uncategorized

रुग्णांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी


नांदेड प्रतिनिधी:-
येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्ण तसेच मयतांची खाजगी वाहनधारक अवैधरित्या वाहतूक करत असल्यामुळे नोंदणीकृत रुग्णवाहिका धारकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे या अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाशक्ती ॲम्बुलन्स समाजसेवा असोसिएशन च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांची वाहतूक करण्यासाठी नोंदणीकृत खाजगी रुग्णवाहिका धारक रुग्णांची वाहतूक करून आपला उदरनिर्वाह करतात. सध्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये १५ ते २० नोंदणीकृत रुग्णवाहिका कार्यरत असून शासकीय नियमानुसार वाहतुकीच्या दराने रुग्णांची तसेच मयतांची वाहतूक करतात. यामध्ये अनेक रुग्णवाहिका धारकांनी बँकेकडून कर्ज घेऊन रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. त्यांना चार-चार दिवस भाडे लागत नाही. त्यात गाडीचे मेंटेनन्स, बँकेचा हप्ता आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना या रुग्णवाहिका चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. असे असतानाही या रुग्णालय परिसरामध्ये मारुती, ओमिनी, स्विफ्ट डिझायर असे खाजगी घरगुती वाहनधारक रुग्णालयातील रुग्ण तसेच मयातांच्या नातेवाईकांकडून अवाच्या सव्वा भाडे आकारून अवैध वाहतूक करत आहेत. त्यामुळे नोंदणीकृत रुग्णवाहिका धारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या अवैध वाहतूक करणारास समज देण्याचा प्रयत्न केल्यास नोंदणीकृत रुग्णवाहिका धारकांना अरेरावीची भाषा वापरून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती घालत आहेत. त्यामुळे अशा अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने अमरण उपोषण करण्यात येईल अशा मागणीचे निवेदन महाशक्ती ॲम्बुलन्स समाजसेवा असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजहर स मजहर, जिल्हा सचिव हारून हुसैन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button