अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल

▫️अंगणात खेळणाऱ्या चिमुरडीशी गैरवर्तन; मुलीच्या आरडाओरड्यामुळे आरोपी घटनास्थळा वरून फरार.
मुखेड : मुखेड तालुक्यातून एक अत्यंत चीड आणणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दिनांक १२ जून रोजी ही धक्कादायक घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या घरासमोरील अंगणात खेळत होती. याच संधीचा फायदा घेऊन आरोपीनेतिला घरात बोलावले आणि तिच्याशी अत्यंत गैरवर्तन (छेडछाड) करण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करताच, पीडित मुलीने घाबरून न जाता तात्काळ आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. मुलीचा आवाज ऐकून कोणीतरी येईल या भीतीने नराधम आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पालकांच्या तक्रारीवरून आरोपी नारायण लक्ष्मण गायकवाड (रा. उमरदरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यातआला आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल पोलीस प्रशासनाने घेतली असून, पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाडयांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जावेद शेख हे या घटनेचा पुढील सखोल तपास करत आहेत.
शोषक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, हीच जनतेची मागणी आहे!



