राजकीय

Nanded MLC Election: …तर नगरसेवकांना इच्छेविरुद्ध डांबून ठेवलंय? ‘वंचित’च्या उमेदवाराचा गंभीर आरोप; नांदेडच्या राजकारणात खळबळ!

नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १३ जून २६ 

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा थरार शिगेला पोहोचला असतानाचनांदेडच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहेवंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि नांदेडवाघाळा महापालिकेचे गटनेते इंजिप्रशांत इंगोले यांनी मतदारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असूननिवडणूक निरीक्षकांकडे धाव घेतली आहेजिल्ह्यातील अनेक नगरसेवक संशयास्पदरित्या गायब असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

इंजिप्रशांत इंगोले यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे कीप्रचारासाठी नांदेडवाघाळा मनपा जिल्ह्यातील विविध नगरपालिकानगरपरिषदांमधील मतदार नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नकेलामात्र मोठ्या संख्येने नगरसेवकांचे मोबाईल बंद किंवा ‘नॉट रिचेबल‘ लागत आहेतप्रत्यक्षभेटीसाठी गेल्यानंतरही ते उपलब्ध झाले नाहीतलोकशाही प्रक्रियेत मतदारांनी सक्रिय सहभाग घेणेअपेक्षित असताना त्यांची मोठ्या प्रमाणावर अनुपस्थिती अनेक शंका निर्माण करणारी आहेमागीलकाही निवडणुकांमध्ये राजकीय दबावप्रलोभनाने निवडणुकांवर प्रभाव टाकल्याच्या चर्चा आहेतत्यामुळे मतदारांना इच्छेविरुद्ध एका ठिकाणी ठेवण्यात आले आहे कात्यांच्यावर दबाव आहे कायाचीनिष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहेअसे इंगोले यांनी पत्रात नमूद केले आहे.

सदरच्या प्रकाराबाबत यंत्रणांमार्फत तातडीने चौकशी करावीमतदार नगरसेवकांची सुरक्षितता मतदानाचे स्वातंत्र्य सुनिश्चित करावेसंपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पारपाडावीअशी मागणी निवडणूक निरीक्षक डॉमाधवी खोडे यांचेकडे इंगोले यांनी केली आहे.

निवडणुकीच्या अगदी तोंडावर नगरसेवकांचे ‘नॉट रिचेबल‘ होणे ही प्रशासनाची डोकेदुखी वाढवणारी बाब ठरत आहेसर्व मतदारांना कोणत्याही भीतीशिवाय आणि दबावा शिवाय मतदान करता येईलअसेभयमुक्त वातावरण निर्माण करण्याचे मोठे आव्हान आता निवडणूक आयोगासमोर असणार आहेयातक्रारीनंतर आता प्रशासन काय पावले उचलतेयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button