क्राईम

स्पा’च्या पडद्यामागे देहविक्रीचा बाजार! नांदेड पोलिसांची धडक कारवाई, सूत्रधारासह ७ महिला जाळ्यात

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड :०२ सप्टेंबर २६

शहरातील अत्यंत गजबजलेल्या फुले मार्केट परिसरात ‘स्पा सेंटर’च्या नावाखाली सुरू असलेल्या हायप्रोफाईल देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकून मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत परराज्यातील सहा तरुणींसह एकूण सात महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या रॅकेटची मुख्य सूत्रधार असलेली महिलाही पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.

मिळालेल्या खात्रीलायक आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक मोहीम राबवली. फुले मार्केटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी मसाज आणि स्पाच्या नावाखाली हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू होता. कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांपैकी बहुतांश महिला या परराज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या सेक्स रॅकेटचे धागेदोरे राज्या बाहेरही पसरलेले आहेत का आणि यात आणखी कोणाचे मोठे रॅकेट सक्रिय आहे का, याचा कसून तपास आता पोलीस करत आहेत.

स्पा सेंटरच्या नावाखाली नेमके कोणाकोणाचे लागेबांधे आहेत आणि या काळ्या धंद्याला छुप्या मार्गाने कोणाचे पाठबळ होते, याचा सखोल तपास यंत्रणांकडून सुरू आहे. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे शहरातील इतर बेकायदेशीर स्पा चालकांचे चांगलेच धाबे दणाणले असून, फुले मार्केट परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया अत्यंत कडक शब्दांत आणि वेगाने राबविली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button