डॉ. प्रमिला पाटील नकाते यांना दक्षिण कोरिया मध्ये पीएच.डी. प्रदान!

मुखेड प्रतिनिधी :-
खतगांव प.दे.पोस्ट बेटमोगरा तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील डॉ. प्रमिला यांना दक्षिण कोरियाच्या जॉनबुक नॅशनल युनिव्हर्सिटी द्वारा पेरोवस्कीटे सोलर सेल्स डिव्हाइसेस या विषयात युनिव्हर्सिटी प्रेसिडेंटच्या हस्ते नुकतीच पीएच.डी.पदवी (विद्यावाचस्पती) प्रदान करण्यात आली आहे.
डॉ. प्रमिला यांनी आपली दुसरी पीएच.डी. कोरिया मधून संपन्न केली. त्यांच्या संशोधनाचा शीर्षक “इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट लेयर (ईटीएल) आणि सुधारित पी-आय-एन स्ट्रक्चर्ड पेरोव्स्काईट सोलर सेल उपकरणांसाठी त्याचे इंटरफेस अभियांत्रिकी ” हा असून त्यांचे गाईड प्रा. डॉ. सेउक इनना हे आहेत.
डॉक्टर प्रमिला यांचे २५ हुन अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रकाशित केले आहेत.
डॉ. प्रमिला यांना सर्वोच्च पीएच.डी. प्रबंध पुरस्कार (प्रमाण पत्र आणि ४३००० रुपये) मिळाला आहे.
डॉ. प्रमिला यांनी रसायनशास्त्र या विषयातून पदवीत्तर पदवी कर्नाटक विद्यापीठातून अर्जित केली आहे.
डॉ. प्रमिला यांचे वडील अशोक पाटील (रा. तवंदी, जिल्हा बेळगाव) रिटायर्ड सुभेदार मेजर म्हणून निवृत्त आहेत. डॉ. प्रमिला ह्या त्यांचे पती डॉ. उमेश नकाते आणि २ मुली यांच्या सह ६ वर्ष पासून दक्षिण कोरिया मध्ये राहात आहेत. डॉ. प्रमिलानी घरची बायको आणि आई म्हणून जीम्मेदारी पूर्ण करत त्यांनी दोन पीएच.डी. अर्जित केल्या हि फारच कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे. त्यांचे हे यश खूप मराठी मुलींना प्रेरणादायी ठरेल. डॉ. प्रमिला यांचे ध्येय हे जगाला सौर ऊर्जेचा अक्षम स्रोतकडे नेण्याचे आहे. त्यांना ह्या विषयामध्ये खूप शोध लावायचे आहे आणि जगाला जीवाश्म इंधनापासून मुक्ती देण्याचे आहे. डॉ. प्रमिला यांना हनयांग युनिव्हर्सिटी सेऊल कोरिया येथे पदवीत्तर संशोधक या पदावर त्यांची नुकतीच निवड झाली आहे. आणि त्या लवकरच रुजू होतील. डॉ. प्रमिला यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डॉ. प्रमिला नकाते ह्या पत्रकार यशवंत बोडके यांच्या चुलत मेव्हणाच्या पत्नी आहेत.



