कर वसुलीसाठी वजीराबाद क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एक कार्यालय, दोन दुकाने, एक डेनेज ,दोन नळ खंडित

नांदेड:- प्रतिनिधी
दि.17 ऑक्टोबर 2023 रोजी महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्र.4 वजीराबाद अंतर्गत श्री अजय बबनराव गावंडे रा बोरबन यांचा मालमत्ता क्र. 2-11-106 वर मालमत्तेवर रुपये एकुण रूपये 14लक्ष07हजार953/-कर थकीत असल्याने कर वसुली पथकास संबधिताने कर भरणा करण्यास नकार दिल्याने सदर मालमत्ता धारकाचे ड्रेनेज व दोन नळ खंडित करण्यात आले आहे.
तसेच मालमत्ता क्र.3-3-1189 बलविंदरकौर चिमा यांच्या मालमत्तेवर 2लक्ष18हजार142/ रू.कर थकीत असल्याने संबंधितांचे दोन दुकान सिल करण्यात आले.मालमत्ता क्र.2-11-372 मिथलेशदेवी रा.शर्मा यांच्याकडे रु1लक्ष87हजार133/ कर थकीत असल्याने सदर मालमत्ते मधील संपर्क कार्यालय सिल करण्यात आले.
सदर कार्यवाही मा. आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे ,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,उपायुक्त (महसुल ) डॉ.पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव पथकातील गौतम कवडे,अजहर अली,इर्शाद,महेंद्र नांगरे,तुराब ,सागर सरोदे ,शुभम कागडा यांनी सदर कारवाई केली.



